सतेज पाटीलही "गोकुळ'मध्ये घुसले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कोल्हापूर - कॉंग्रेस आघाडीच्या ताब्यातील सदस्या राणी खलमेट्टी यांना हॉटेलमधून विरोधी आघाडीने नेल्याचे समजताच कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील हे कार्यकर्त्यांसह ताराबाई पार्कातील "गोकुळ'च्या कार्यालयात घुसले. तेथे हे सदस्य ठेवल्याचा त्यांचा संशय होता; पण तेथे सदस्य नव्हते. या घटनेने "गोकुळ' परिसरातील वातावरण मात्र तणावपूर्ण बनले. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजप-ताराराणी आघाडीसोबत राहिलेल्या सौ. खलमेट्टी या शुक्रवारी कॉंग्रेस आघाडीच्या सदस्यांसोबत सहलीवर गेल्या होत्या. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या त्या कार्यकर्त्या आहेत. काल रात्री कॉंग्रेस आघाडीचे सदस्य पुण्याहून थेट मार्केट यार्डसमोरील हॉटेल रसिकामध्ये आले. दरम्यान, आज सकाळी दोन-तीन वाहनांतून आलेले कार्यकर्ते सौ. खलमेट्टी यांना हॉटेलमधून घेऊन गेले. ही माहिती समजताच आमदार पाटील पहिल्यांदा हॉटेलमध्ये आले. त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली व कार्यकर्त्यांसह थेट ताराबाई पार्कातील "गोकुळ'चे कार्यालय गाठले. या कार्यालयात आल्यानंतर वाहनांसह ते थेट आत घुसले. त्यांनी कर्मचाऱ्यांकडे सदस्यांबाबत विचारणा केली; पण याठिकाणी सदस्य नसल्याचे समजताच ते निघून गेले. या प्रकाराने "गोकुळ'च्या कार्यालय परिसरातील वातावरणही तणावपूर्ण बनले. 

Web Title: satej patil entered in the Gokul