"युनो'च्या परिषदेसाठी डॉ. सतीश करंडे यांची निवड 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील तज्ज्ञास युनोच्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे. 

सोलापूर ः शेटफळ (ता. मोहोळ) येथील डॉ. सतीश करंडे यांची संयुक्त राष्ट्र संघाच्या (यूनो) जागतिक हवामान परिषदेसाठी (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 25) निवड झाली आहे. ही परिषद 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत स्पेन मधील माद्रीद येथे होत आहे. जगभरातील 197 देशातील मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील तज्ज्ञास युनोच्या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची ही दुर्मिळ घटना आहे. 
हवामान बदलाचे संकटाने जगभर चिंता वाढली आहे. यावर चर्चा या परिषदेमध्ये होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने शास्त्रज्ञ, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार यांना या परिषदेसाठी आमंत्रित केले आहे. त्यामध्ये लेखक - मुक्त पत्रकार या गटातून डॉ. करंडे यांची निवड झाली आहे. डॉ. करंडे यांनी आजपर्यंत केलेल्या हवामानबदल अनुषंगिक संशोधनावर आधारित संशोधन लेख कॅनडा, सिंगापूर, हैद्राबाद, मलेशिया या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये सादर केले आहेत. आजपर्यंत त्यांचे 25 चे वर संशोधनपर लेख राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. 
कृषी धोरणावर चर्चा करणारे व अभ्यासपूर्ण अनेक लेख त्यांनी दैनिक अग्रोवोन, दैनिक सकाळमध्ये लिहले आहेत. दैनिक "अग्रोवन'मधील त्याची लेखमाला विशेष गाजली होती. सध्या दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होत असणारी त्यांची लेखमाला वाचकप्रिय ठरत आहे. त्यांची दुष्काळ, कृषी धोरण व शिक्षण या विषयावरील तीन पुस्तके सुगावा सारख्या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहेत. शिवाय फूडस्टम्प, डाळिंब गुणवत्ता सुधार अभियानासारख्या उपक्रमात त्यांनी विशेष सहभाग नोंदविला आहे. संशोधनपर लेखाबरोबर मुक्त पत्रकार म्हणून कृषी धोरणावरचे सातत्याचे लिखाण यामुळे या परिषदेसाठी निवड झाली, असे आवर्जून त्यांनी सांगितले. 
या निवडीसाठी त्यांनी दैनिक "सकाळ'चे विशेष आभार मानले आहेत. सध्या ते लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाला येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अशा उपक्रमास नेहमीच माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे प्रोहात्सन असते, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satish karande selected for international conference