सत्यजीत देशमुख म्हणाले, म्हणूनच केला काँग्रेसला रामराम...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

शिराळा - काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजीत देशमुख यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. सत्यजीत सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादीने नेहमीच आम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस आपला माणूस सोडून राष्ट्रवादीच्या मागे धावली, ही घुसमट सहन न झाल्याने मी हा निर्णय घेतला आहे, असे सत्यजीत यांनी आज जनसंवाद मेळाव्याचे जाहीर केले. 

खासदार संजयकाका पाटील, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला. रेड (ता. शिराळा) येथे आयोजित जनसंवाद मेळाव्याला देशमुख समर्थक गट मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सत्यजीत देशमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, पहिले मत तुम्हाला, असे सांगत कार्यकर्त्यांनी निर्णयाची मोकळीत दिली. सत्यजीत यांनी एकूणच राजकीय वाटचालीचा आढावा घेत राष्ट्रवादीवर विशेष नाराजी व्यक्त केली. काँग्रेसशी आम्ही नेहमीच प्रामाणिक राहिलो, मात्र आमच्यापेक्षा राष्ट्रवादीला महत्व असेल तर उपयोग काय? अशा पक्षात राहण्यापेक्षा भाजपमध्ये जाणे चांगले, अशी भावना सत्यजीत यांनी व्यक्त केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyajeet Deshmukh comment