विधानसभेला थोरातांचा भाचा विखेंच्या विरोधात लढणार !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आज काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वात जास्त इच्छुक शिर्डी मतदारसंघातून असल्याचे दिसून आले.

नगर : विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून आज काँग्रेसच्यावतीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्वात जास्त इच्छुक शिर्डी मतदारसंघातून असल्याचे दिसून आले.

निरीक्षक म्हणून पुणे येथील माजी आमदार मोहन जोशी, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी मुलाखती घेतल्या. युवक कॉंग्रेसच्या लाल टाकी रस्त्यावरील कार्यालयात या मुलाखती झाल्या.

मुलाखती दिलेले इच्छुक पुढीलप्रमाणे : 
संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात (अर्ज दिला)
शिर्डी : सत्यजीत तांबे, राजेंद्र निर्मळ, दत्तात्रेय खुळे, एकनाथ गोंदकर, श्रीकांत मापारी, शिवाजीराव थोरात, मिनानाथ वर्पे, रावसाहेब बोठे, लता डांगे.
कोपरगाव : अशोक खांबेकर
श्रीरामपूर : भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब डोळस, रवी डोळस, विजय
खाजेकर, विलास खाजेकर, भिकाजी रणदिवे, जगन्नाथ आव्हाड, हेमंत ओगले, राजेंद्र वाघमारे.
नेवासे : राजेंद्र वाघमारे, जयवंत गुडघे, दिगंबर शिंदे, जाकिर शेख.
शेवगाव : समद काझी, शाहबुद्धीन शेख, अमोल फडके.
राहुरी : बाळासाहेब आढाव, बाबासाहेब धोंडे, दीपक पठारे, पंढीरनाथ पवार.
पारनेर : प्रताप शेळके.
नगर शहर : दीप चव्हाण, शामराव वाघस्कर, बाळासाहेब भुजबळ, फिरोज खान, उबेद शेख, मोहंममद शेख.
श्रीगोंदे : अनुराधा नागवडे.
कर्जत-जामखेड : मिनाक्षी साळुंके, प्रवीण घुले, किरण पाटील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satyajeet Tambe Demands Ticket in Shirdi Vidhansabha