मानाचे जग उत्साहात सौंदत्तीला रवाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

कोल्हापूर - सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी ‘उदे ग आई उदे’ज्या गजरात आज जग रवाना झाले. अतंर्गत वादामुळे उदय शेंडे यांचा जग सौंदत्तीला जाणार की नाही याबाबत शंका होती. मानाचे जग सौंदत्तीला गेल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे सांगितले जाते. दोन्ही रेणुका भक्त संघटनांनी पुढाकार घेऊन शेंडे यांनी जग पाठविण्यासंबंधी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. शेंडे, शिवाजीराव आळवेकर यांच्यासह अन्य जग रवाना झाले. यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी (ता. १२) आहे. शनिवारपासून डोंगराला गाड्या जाण्यास सुरवात होईल. यात्रेच्या मुख्य दिवशी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या मोठी आहे.

कोल्हापूर - सौंदत्ती येथे होणाऱ्या रेणुकादेवीच्या यात्रेसाठी ‘उदे ग आई उदे’ज्या गजरात आज जग रवाना झाले. अतंर्गत वादामुळे उदय शेंडे यांचा जग सौंदत्तीला जाणार की नाही याबाबत शंका होती. मानाचे जग सौंदत्तीला गेल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही असे सांगितले जाते. दोन्ही रेणुका भक्त संघटनांनी पुढाकार घेऊन शेंडे यांनी जग पाठविण्यासंबंधी विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. शेंडे, शिवाजीराव आळवेकर यांच्यासह अन्य जग रवाना झाले. यात्रेचा मुख्य दिवस सोमवारी (ता. १२) आहे. शनिवारपासून डोंगराला गाड्या जाण्यास सुरवात होईल. यात्रेच्या मुख्य दिवशी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या मोठी आहे. यात्रेची लगबग शहरात सुरू झाली असून सव्वाशेहून अधिक एसटी बस यंदा रवाना होतील, अशी शक्‍यता आहे. खोळंबा आकार कमी झाल्याने गाडीमागे किमान पाच हजार यंदा यात्रेकरूंचे वाचणार आहेत.

Web Title: saundati yatra