सौंदत्ती यात्रा २१ डिसेंबरपासून

सौंदत्ती यात्रा २१ डिसेंबरपासून

कोल्हापूर - सौंदत्ती डोंगर येथे २१ डिसेंबरपासून सौंदत्ती यात्रेला प्रारंभ होत आहे. या दिवशी रात्री आठला श्री रेणुका मातेचा पालखी सोहळा होईल. यात्रेसाठी शहर आणि परिसरातून दीड लाखांवर भाविक सौंदत्ती यात्रेला जाणार आहेत. १९ डिसेंबरला पहाटे सर्वजण डोंगराकडे प्रयाण करतील. 

श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटना, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त मंडळाकडून पावणेदोनशे एसटी बसमधून भाविकांना नेण्यासाठी नियोजन केले आहे.  १५ डिसेंबरला मंगळवार पेठ, बेलबाग येथील शिवाजीराव आळवेकर, रविवार पेठेतील संदीप पाटील, मंगळवार पेठेतील सोनाबाई जाधव, शुक्रवार पेठेतील राजू जाधव यांच्या मानाच्या जगांचे प्रयाण होईल. 

बिंदू चौकातील टेंबलाई, मरगाबाई मंदिराजवळ देवीच्या जगांचे पूजन केले जाईल. यानंतर १६ डिसेंबरला पहाटे सौंदत्ती डोंगराजवळील जोगनभावी कुंडाजवळ पोचेल. १७ डिसेंबरपासून यात्रेच्या मुख्य दिवसापर्यंत लिंब नेसण्याचा विधी होईल. 
श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेतर्फे पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर विभागामार्फत १५० गाड्या आरक्षित केल्या जातात.

यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या एसटी बसचे दरपत्रक आणि अडचणीसंदर्भात सहकार्य मिळावे, असे परिवहन विभागाला सांगण्यात आले. यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या गाड्या चांगल्या आणि सुरक्षित असाव्यात. गाडीला कॅरेजची सोय असावी. टायर्स, जॅकची व्यवस्था असावी.

कागल येथे गाडी तपासणीसाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. चालक हे निर्व्यसनी असावेत. खोळंबा आकार, जीएसटी कायमस्वरूपी बंद करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, संजय मांगलेकर, प्रदीप साळोखे, किरण मोरे, प्रशांत खाडे, विजय पाटील, श्री. बिरंबोळे, श्री. देवणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com