रुकडीतील युवकाचा सयाजी शिंदे यांना गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

हातकणंगले - सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची रुकडी (ता. हातकणंगले) येथील एका युवकाने जमीन खरेदी प्रकरणात 35 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिंदे यांनी दोन महिन्यापूर्वीच हातकणंगले पोलिसांत तक्रार दिली आहे. याबाबत शिंदे यांनी पोलिसांसमोर म्हणणे मांडले; मात्र एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने संबंधित युवकालाच हाताशी धरून या प्रकरणात हात ओले करून घेतल्याने अभिनेते शिंदे यांना तब्बल 35 लाखांवर पाणी सोडावे लागले. 

हिंदी, मराठी व दक्षिणात्य चित्रपटात कसदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या शिंदे यांच्याशी रुकडीतील एका युवकाने जमीन खरेदी करून देण्याचा करार करून 35 लाखांची फसवणूक केली आहे. संबंधित युवकाने इतरही अनेक अभिनेत्यांना अशा प्रकारे गंडा घातल्याची चर्चा आहे. परिसरात जमीन घेऊन देण्याच्या बहाण्याने त्याने शिंदे यांचीही 35 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी दिली होती. चौकशीसाठी शिंदे हातकणंगले पोलिस ठाण्यात आले असता एका बड्या पोलिस अधिकाऱ्याने युवकालाच हाताशी धरून शिंदे यांना कचाट्यात पकडण्याचा डाव रचला; मात्र नुसता ससेमिरा मागे नको म्हणून शिंदे 35 लाखांवर पाणी सोडून निघून गेले. 

Web Title: Sayaji Shinde discipleship