कोसळणाऱ्या दरडीखालून जीवघेणा प्रवास!

प्रशांत गुजर
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सायगाव - सायगाव-आनेवाडी विभागातील मोरखिंड घाटात प्रवास करणे अगदी दरडी कोसळण्याच्या अवस्थेत असल्यामुळे प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

सायगाव-आनेवाडीसह विभागातील रायगाव, महिगाव, दुदुस्करवाडी, दरे, मोरघर, पवारवाडी, महामुलकरवाडी, खर्शी या गावांतील लोकांना मेढ्याला जाण्यासाठी जवळचा मार्ग या घाटातून जातो. वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू असते. या घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी मोठे दगड पडण्याच्या अवस्थेत आहेत. पाऊस चालू असताना अनेक छोटे-मोठे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

घाटात काही ठिकाणी संरक्षक कठडेदेखील नसल्यामुळे धोक्‍यात आणखी वाढ झाली आहे. पावसाळ्यात नेहमी डोंगरातील लाल माती वाहून रस्त्यावर येते. त्यामुळे अनेक वाहनांची घसरगुंडी होते. त्यातच या वाहून येणाऱ्या मातीबरोबर मोठाले दगडही रस्त्यावर येतात. तरीही संबंधित विभागाने आजपर्यंत या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. अनेकदा रस्त्यावर आलेल्या या दगडी वाहनचालकांनी बाजूला केल्या आहेत. 

श्रावण महिना चालू असल्याने या ठिकाणी श्री क्षेत्र मेरुलिंग येथे जिल्हाभरातून अनेक पर्यटक येतात. मेरुलिंग मंदिराकडे जातानाही मोठी वळणे असणाऱ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम अर्धवट ठेवले आहे. या ठिकाणी तर डोंगर फोडला असल्याने दगड निसटले आहेत. जोरदार पाऊस पडला तर हे दगड निसटण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास नरफदेव गावच्या लोकांची वाहतूक बंद होऊ शकते. घाटात दिशादर्शक फलक नसल्यानेही वाहनचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासनाने या प्रकारांकडे लक्ष दिले नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मोरखिंड घाटात वारंवार दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाळ्यात वाहतूकही बंद होते. घाटात संरक्षक कठडे नसल्याने धोक्‍याची स्थिती आहे. संबंधित विभागाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात.
- अमर गायकवाड, ग्रामस्थ, मोरघर

Web Title: saygav satara news The fierce march from the lanslide collapse!