वृक्षलागवडीत ७० लाखांचा घोटाळा

सुनील पाटील
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर - सरकारच्या चार कोटी वृक्षलागवडीचा कोल्हापूर जिल्ह्यात फज्जा उडविण्याचे काम वनअधिकाऱ्यांनी केले आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये शिल्लक असणारी रोपे यावर्षीच्या मे महिन्यात गायब झाल्याने ७० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. लाखो रोपे मेली, असे दाखवून त्याचा इतर ठिकाणी वापर करून हा घोटाळा केल्याचे निदर्शनास येत आहे. 

रोजगार हमी योजनेतून व इतर योजनांमध्ये शासनाच्या चार कोटी वृक्षलागवडीसाठी २८ लाख ९६ हजार ६९७ रोपे तयार केली होती. या रोपांपैकी १ जुलै ते ७ जुलै दरम्यान ११ लाख १० हजार ४०५ रोपे प्रत्यक्ष रोपण केली होती. वृक्षारोपणातून शिल्लक राहिलेल्या रोपांचा हिशेब करण्यात आला. ऑगस्ट २०१७ मध्ये १७ लाख ८६ हजार २९२ शिल्लक होती; मात्र याच शिल्लक रोपांमधील मे २०१८ अखेर १० लाख ७४ हजार ८८५ रोप शिल्लक दाखवली आहेत. उर्वरित ७ लाख १६ हजार ४०८ रोपांना पाय फुटले की काय, असे शंका येऊ लागली आहे. 

प्रतिरोप दहा रुपयांप्रमाणे तब्बल ७० लाख रुपयांहून अधिक रोपे गेली कुठे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

गेल्यावर्षी १ जुैल ते ७ जुलै २०१७ मध्ये चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्य होते; मात्र या सात दिवसांत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. ऑगस्टनंतर जिल्ह्यात कोठेही वृक्षलागवड झाली नाही. त्यामुळे ऑगस्ट २०१७ अखेर जिल्ह्यातील अकरा वनक्षेत्रात एकूण १७ लाख ८६ हजार २९२ रोपे शिल्लक असल्याचे दाखवले आहे. नऊ महिन्यांत म्हणजे मे २०१८ पर्यंत ७ लाख १६ हजार ४०८ झाडे मरू शकत नाहीत. त्यामुळे रोपे गेली कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Scam in Tree Plantation