शिष्यवृत्तीचा सराव आता मोबाईल ऍपद्वारे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

सातारा - पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी "ईझी ऍप'द्वारे ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा निर्णय माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम जिल्ह्यातील माध्यमिक शाळांत राबविला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून, सराव चाचण्याही ऑनलाइन घेता येतील. 

विज्ञान, भाषा, गणित विषयांसंबंधी अडचणी घरी सोडवता याव्यात, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन व्हावे, विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका देऊन घरबसल्या परीक्षा देता यावी आणि पालकांनासुद्धा विद्यार्थ्यांचे गुण कळावेत, यासाठी पुणे येथील "अभिनव' कंपनीने ईझी टेस्ट (ezee test app) ऍप विकसित केले आहे. पालक, विद्यार्थ्यांनी हे ईझी ऍप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन प्रश्‍नसंच उपलब्ध होणार आहे. श्री. क्षीरसागर, अभिनव आयटी सोल्यूशनचे कार्यकारी व्यवस्थापक प्रा. एम. एस. भुतडा यांच्या संकल्पनेतून हे ऍप विकसित केले आहे. बुलडाणा व अकोला जिल्ह्यामध्ये हा उपक्रम लोकप्रिय ठरला आहे. 
गणित व विज्ञान या विषयांच्या टेस्ट मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्याने परीक्षा दिल्यानंतर तत्काळ निकाल पाहण्याची सोय उपलब्ध असणार आहे. शिवाय तो निकाल मुख्याध्यापकांच्या ऍपमधूनही दिला जाणार असून, हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असणार आहे, असे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

Web Title: Scholarships practiced by the mobile app