शाळाप्रवेशाच्या वयामध्ये शिथिलता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

शासनाने बालकांच्या शाळाप्रवेशाचे वय निश्‍चित केले आहे. त्या वयामध्ये बदल करण्याबाबत शासनाकडे वारंवार निवेदने दिली जात होती. मात्र, त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. पण, आता शाळाप्रवेशाच्या वयामध्ये १५ दिवसांची शिथिलता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे काठावर वय असलेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी सोईस्कर होणार आहे.

सोलापूर - शासनाने बालकांच्या शाळाप्रवेशाचे वय निश्‍चित केले आहे. त्या वयामध्ये बदल करण्याबाबत शासनाकडे वारंवार निवेदने दिली जात होती. मात्र, त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. पण, आता शाळाप्रवेशाच्या वयामध्ये १५ दिवसांची शिथिलता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे काठावर वय असलेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी सोईस्कर होणार आहे.

शाळाप्रवेशासाठी बालकांचे किमान वय हे ३० सप्टेंबरला तीन वर्षे पूर्ण व्हायला हवे. त्याचबरोबर पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकाच्या वयाची सहा वर्षे पूर्ण झालेली असावीत, असा पूर्वीचा आदेश आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना एक-दोन दिवस किंवा एक आठवडा जरी कमी असला, तरी त्या बालकाला प्रवेश देता येत नव्हता. अशावेळी एक आठवडा कमी असलेल्या वयाची बालके तशीच शाळेत येऊन बसत होती. तशा बालकांची संख्याही मोठी असल्याचे अनेक वेळा दिसून आले होते. 

पण, आता नर्सरी व पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी १५ दिवसांची शिथिलता शासनाने दिली आहे. कोणत्या मुलांना शिथिलता द्यायची, याचे अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Admission Age