बुदिहाळ येथे शाळकरी मुलाची आत्महत्या

कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर
Soham Shivaji Magdoom
Soham Shivaji Magdoomsakal

कोडणी : बुदिहाळ (ता. निपाणी) येथे शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी (ता. ५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सोहम शिवाजी मगदूम (वय 14) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, सोहम हा निपाणीतील एका शिक्षण संस्थेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. सध्या परीक्षा संपल्यामुळे शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे तो सध्या घरीच होता. सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यात दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. कुटुंबीयांना घरी न दिसल्यामुळे त्याची शोधाशोध केली असता जनावरांच्या गोठ्यात आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिसात झाली आहे. निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सोहम याच्या मागे आजी, आजोबा, आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर

सोहम याच्या आई-वडिलांनी अलीकडेच काबाडकष्ट करून नवीन घरकुलाचे स्वप्न साकार केले आहे. आठ दिवसांपूर्वीच या घरकुलाची वास्तुशांती झाली होती. त्यातच आता एकुलता असणारा मुलगा निघून गेल्यामुळे मगदूम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोहम मगदूम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com