शाळकरी मुलाचा डेंगीने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - शहरात डेंगीने शाळकरी मुलाचा आज बळी घेतला. कर्तव्य सुमित ओसवाल (वय 10, रा. खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंगजवळ) असे मृत बालकाचे नाव असून, डेंगीने घेतलेल्या बळींची संख्या आता आठ इतकी झाली आहे. डेंगीने शाळकरी मुलाचाही बळी गेल्याने शहरभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शहरात अडीच महिन्यांहून अधिक काळ डेंगीने थैमान घातले आहे. जूनपासून सुरू झालेली ही साथ जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पसरली. काही हजारांवर रुग्ण शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दाखल झाले आहेत. खरी कॉर्नरजवळील कर्तव्य सुमित ओसवाल हा दहा वर्षांचा मुलगा शांतिनिकेतन हायस्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. त्याला पंधरा दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते; पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. त्याच्या किडन्या निकामी झाल्या. त्याच्या मेंदूतही गाठी झाल्या. अखेर आज उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या कुटुंबीयावर आणि आसपासच्या परिसरावरही शोककळा पसरली आहे. सायंकाळी सहा वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आला. कर्तव्यच्या मागे आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे.

Web Title: School boys dead for dengue