शालेय स्तरावर रोज असावा योगासनाचा तास

 School class is daily or yoga hours
School class is daily or yoga hours

महाराष्ट्र योग असोसिएशन, सोलापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर योग असोसिएशन आयोजित 30 वी राज्यस्तरीय पंच परीक्षा  रविवारी येथील ए. आर. बुर्ला महाविद्यालयात पार पडली. त्यासाठी श्री. पांगारे सोलापुरात आले आहेत. ते भारताच्या वेस्ट विभागाचे झोनल सेक्रेटरी, टेक्‍निकल बॉडी मेंबरही आहेत. दरम्यान, विशेष संवाद साधताना ते म्हणाले, चीनमध्ये व्यायाम, जीम बंधनकारक आहे. त्यामुळेच तर त्यांचे खेळाडू ऑलिंपिक तक्‍त्यात अधिकप्रमाणात दिसून येतात. तसेच आपल्याकडेही शालेय पातळीपासूनच योग तासिका सक्तीची केल्यास महाराष्ट्र तंदुरुस्त तर होईल. रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

शालेय वेळापत्रकात जर योग तासिकाचा समावेश करायचा झाल्यास त्यासाठी तेवढी शिक्षक यंत्रणा महाराष्ट्रात उपलब्ध आहे का, यावर श्री. पांगारे म्हणाले, का नाही, मागणी येईल तसा पुरवठा करण्याइतपत राज्यभर योगशिक्षकांची फळी सध्याही तयार आहे. योगासनांचा कोर्स करूनही काहींना जॉब नाहीत. मी स्वतः पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतून योग्य शिक्षण देऊन योगासनाचे 22 शिक्षक तयार केले आहेत. ते रोज पुण्यातील विविध कंपन्या, सोसायट्या, अपार्टमेंटमध्ये तास घेत आहेत. त्यांना सध्या 12 पासून 42 हजार रुपयांपर्यंत ते दरमहा वेतन, मानधन मिळत आहे. 

आंतरराष्ट्रीय योग खेळाडूंविषयी श्री. पांगारे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळलेल्या प्रत्येक खेळाडूला शिष्यवृत्ती मिळावी यासाठी मी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी मी पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात असंख्यवेळा चक्करा मारल्या आहेत. खरंच सांगतो, जर खेळाडूंना अशी शिष्यवृत्ती मिळाली तर नक्‍कीच या खेळास, खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. 

श्री. पांगारे म्हणाले, सोलापूर परिसरात योग चळवळ चांगल्या प्रकारे रूजतेय. याचा पुरावा म्हणजे आजच्या या पंच परीक्षेसाठी सोलापूर शहरासह ग्रामीण भागातूनही खूप लोक आहेत. महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हे निश्‍चितच भूषणावह आहे. आजच्या पंच परीक्षेत 148 जणांनी सहभाग घेतला. हे छान वाटले. 

पंच परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी श्री. पांगारे म्हणाले, हा काही पीएच.डी. सारखा थेरॉटिक अभ्यास नाही. स्पर्धकाने उत्कृष्ट आसन केले आहे की नाही याचे जेजिंग करून त्यास योग्य मार्क देणे म्हणजे पंच नव्हे. तर स्पर्धकाच्या चुका शोधून मार्क कमी करणे म्हणजे जेजिंग. या परीक्षेसाठी 110 आसनांचा अभ्यासक्रम निश्‍चित केला आहे. आसन त्याचे चेकपॉइंट याचे पीपीटीद्वारे प्रक्षेपण सादर करण्यात आले आहे. आर्टिस्टिक सोलो, आर्टिस्टिक पेअर, हिृदमिक योगा, फ्री फ्लो योगा या चार स्पर्धा कशा घेतल्या जातात त्याची नियमावली, किती आसनं करावी, म्युझिक कसे असावे, कुणी सहभाग घ्यावा याची माहिती परीक्षार्थींना यावेळी देण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगाचे प्रॅक्‍टिकल दाखवून त्याचे मूल्यमापन कसे करावे हे पण यावेळी शिकवले. त्यानंतरच परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्यानिमित्ताने मी स्वतः फेडरेशन मान्यताप्राप्त योगासनांची नियमावली आणि मूल्यमापन याविषयी गाईडलाईन्स दिल्या. स्कूल कॉम्प्युटिशन ऑफ इंडिया या शालेय योगासन स्पर्धेचे, आसनांचे मूल्यमापन याची माहिती महाराष्ट्र योग असोसिएशनचे जतीन सोलंकी यांनी दिली. पाच तासांच्या प्रशिक्षणानंतर दीडशे विद्यार्थी - विद्यार्थिनींची याविषयी दीड तासांची परीक्षा घेण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com