विशिष्ट दुकानांतून खरेदीचे पालकांना मेसेज!

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 16 एप्रिल 2018

सातारा - शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा शाळांद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. एवढ्यावरच न थांबता आता काही शाळा तर ठराविक दुकानांतूनच वह्या, शैक्षणिक साहित्य, दप्तर, गणवेश खरेदीची सक्ती करू लागले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचे संदेश पालकांच्या मोबाईलवर ‘किलबिला’ट करू लागले आहेत. एका शाळेने तर चक्क शाळेत पुस्तक आणि शैक्षणिक साहित्याची विक्री सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे.

शाळांमध्ये वह्या-पुस्तके, गणवेश या शैक्षणिक साहित्याची विक्री करू नये; तसेच ठराविक दुकानांमधून ती खरेदी करण्याची सक्तीही करू नये, असा केंद्र व राज्य शासनाचा आदेश आहे. या आदेशामुळे शाळांच्या बेकायदेशीर विक्रीला चाप बसेल, ही अपेक्षा सध्या तरी फोल ठरताना दिसते आहे. काही इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांनी या आदेशाचे पालन करण्याऐवजी आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच आपापली दुकाने थाटण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या शाळा आघाडीवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरानजीकच्या एका सीबीएसई बोर्डाच्या शाळेने पालकांना त्यांच्या मोबाईलवर अमुक-तमुक दुकानांतूनच गणवेश तसेच शैक्षणिक साहित्य खरेदी करावे, असा संदेश पाठविण्यास प्रारंभ केलेला आहे. या प्रकाराबाबत पालकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.

शिक्षण विभागाच्या नोटिसीला केराची टोपली!
पालकांनी शाळांविरोधात दिलेल्या तक्रारींवर शिक्षण विभाग संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस देऊन पालकांना शांत करते. मात्र, संबंधित शाळा अशा नोटिसांना उत्तर देत नाहीत, अशी माहिती नुकतीच समोर आली आहे. यामुळे शाळांकडून होणारे गैरप्रकार थोपविण्यासाठी नेमके काय करावे, असा प्रश्‍न पालकांसमोर उभा राहिला आहे.

Web Title: school dress purchasing education