सुट्टीची बनावट पत्रे व्हायरल; गुन्हा दाखल हाेणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शाळांच्या सुट्टीबाबतची जिल्हाधिकारी सिंघल यांच्या सहीची बनावट पत्रे व्हायरल करणाऱ्यांची आता तंतरणार आहे.

सातारा ः जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने उद्या (शुक्रवार ता. 9) शाळा - महाविद्यालयांना सुट्टी दिल्याचे एक बनावट पत्र सोशल मिडियावर आज (गुरुवार) पून्हा व्हायरल झाले.
ही बाब "सकाळ'च्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी अशी बनावट पत्रे व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सायबर क्राईम विभागास दिले आहेत. 
दरम्यान उद्या (शुक्रवार) शाळा- महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सायंकाळी निर्णय घेण्यात येईल असे ही सिंघल यांनी नमूद केले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School holiday fake lettter viral

टॅग्स