#SataraFlood शाळेच्या सुट्टीबाबत खाेडसकळापणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

`सकाळ` ने सर्व प्रथम शाळांच्या सु्ट्टीबाबत ई-सकाळवर वृत्त प्रसिद्ध केले. परंतु काही समाजकंटकांनी खाेडसळपणा करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

सातारा ः पूर परिस्थितीमुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणाऱ्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पत्रामध्ये काही समाजकंटकांनी फेर बदल करुन सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले. 
गेले तीन दिवस जिल्हाधिकारी सिंघल या त्यांच्या सही व शिक्‍क्‍यासह सुट्टीबाबतचे पत्र काढत आहेत. त्यानूसार माण तालुका वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असयाची. आज (बुधवार) जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा, जावळी, महाबळेश्‍वर, वाई, कराड व पाटण या सहाच तालुक्‍यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश काढले. पावसाचा जोर कमी झाल्याने कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण व खटाव या तालुक्‍यांना सुट्टीमधून वगळण्यात आले. परंतु काही समाजकंटकांनी खोडसाळपणा करुन गेले दोन दिवसांच्या पत्रात फेर बदल केले. यामध्ये गुरुवार ता. नऊ आणि बुधवार ता. आठ असे नमूद करुन माण वगळता अन्य सर्व तालुक्‍यांत शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची जिल्हा प्रशासनाने गंभीर देखील घेतली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School holidays in the rainy season fake letter viral