बेळगावात शाळा सुरु पण विद्यार्थ्यांची पसंती ऑनलाईनलाच 

मिलिंद देसाई
Sunday, 10 January 2021

शाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले तरी अजुनही वर्गात सर्व विद्यार्थी हजेरी लावण्याकडे दुर्लक्ष

बेळगाव : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले तरी अजुनही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली नाही. शाळेत नववी व दहावीच्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे तर सहावी ते आठवीपर्यंतचे 60 ते 70 टक्‍के इतकेच विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत. 
एक जानेवारीपासुन शिक्षण खात्याच्या सुचनेनुसार शाळांना सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्या दिवसापासुनच नववी व दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थी शाळेत कमी संख्येने हजेरी लावीत असल्याचे दिसुन येत  आहे.

 शिक्षण खात्याकडुन दररोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. त्यानुसार शाळा सुरु होऊन अनेक दिवस झाले तरी अजुनही वर्गात सर्व विद्यार्थी हजेरी लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शाळा सुरु झाल्यातरी कोणत्याही विद्यार्थ्यांवर शाळेत येण्यासाठी सक्‍ती करण्यात आलेली नाही. तसेच जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांना ऑनलाईन शिक्षणाची मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेत येण्याऐवजी ऑनलाईन शिक्षण घेत आहे. 

याच बरोबर इतर कारणांनी देखिल विद्यार्थी शाळेला दांडी मारीत असल्याचे दिसुन येत असुन पालकांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवुन देण्यास प्राध्यान्य दिले पाहीजे. असे मत शिक्षण खात्यातुन व्यक्‍त होत आहे. सध्या शहरातील शाळां मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमणात आहे. तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये कमी प्रमाणात विद्यार्थी दाखल होत आहेत. असे चित्र दिसुन येत आहे. 

शाळांमध्ये सध्या 60 ते 70 टक्‍के विद्यार्थी शाळेत येत असुन कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्‍ती नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु लवरकच सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. 

अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी

पहिले तिन चार दिवस वर्गात कमी प्रमाणात विद्यार्थी होते. मात्र आता विद्यार्थी अधिक संख्येने येत असुन सामाजिक अंतर राखण्यासह शिक्षकांनी केलेल्या सुचनांचे पालन केले जात आहे. पालकांनी कोणतीही काळजी न करता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले पाहिजे 
शेजल पाटील, विद्यार्थीनी

संपादन - अर्चना बनगे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School started in Belgaum but students prefer online only