छडी लागे छम छम शाळांतून हद्दपार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

सोलापूर - छडी लागे छम..छम... विद्या येई घम घम...छम..छम..छम.... या बालगीताने एकेकाळी सर्वांच्या मनावर मोहिनी घातली होती. मात्र, शाळांमधून आता छडीची शिक्षा हद्दपार करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना छडीची शिक्षा देऊ नये, असे परिपत्रक प्राथमिक विभागाच्या सहसंचालकांनी शनिवारी काढले असून, ते राज्यातील सर्व शाळांना पाठविले आहे.

शिक्षण बालहक्क कायद्यानुसार (2009) कोणत्याही मुलाला शारीरिक वा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतूद आहे. ही तरतूद लागू झाल्यापासूनच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्यास शिक्षक कचरत होते. त्यात आता छडीचीही शिक्षा वगळण्याबाबत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यानुसार प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी कार्यवाही करायची आहे.

छडी लागे छम..छम.. विद्या येई घम..घम... हे गीत प्रत्येकाच्या ओठावर असायचे. शाळेतील छडीबाबत सर्वांनाच आदरयुक्त भीती असायची. अगदी बालहक्क कायदा लागू होईपर्यंत शिक्षकांकडून छडीचा वापर केला जायचा. मात्र काही शिक्षकांकडून या छडीचा अमर्याद वापर केल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर 2009 मध्ये शिक्षण बालहक्क कायद्यातील तरतुदीमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जाऊ लागू नये अशी तरतूद करण्यात आली. त्यामध्ये छडी वगळण्याबाबत स्वतंत्र उल्लेख नव्हता. मात्र, उपसंचालकांनी काल काढलेल्या परिपत्रकामध्ये छडीची शिक्षा वगळण्याचा स्वतंत्रपणे उल्लेख करून ही शिक्षा रद्द केल्याचे नमूद केले आहे.

छडीची शिक्षा वगळण्यासंदर्भातील शिक्षण सहसंचालकांचे परिपत्रक मिळाले आहे. त्यानुसार कार्यवाही ठेवण्याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल.
- सुधा साळुंके, प्रशासनाधिकारी महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ

Web Title: school student punishment teacher