मोहोळमध्ये स्कॉर्पिओ पलटी होऊन एकाचा मृत्यु

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मोहोळ - विवाह समारंभ ऊरकुन पंढरपूरकडे निघालेली स्कॉर्पिओ एका वळणावर पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाला मोहोळ पंढरपूर महामार्गावरील पेनूर शिवारात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला. प्रदीप महादेव पवार (24) रा वडोली निळेश्वर ता कराड असे मृताचे नाव आहे.

मोहोळ पोलिसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, वडोली येथील पवार कुटुंबीय अक्कलकोट येथुन विवाह सोहळा उरकुन मोहोळ पंढरपूर मार्गे परत गावाकडे स्कॉर्पिओमधून (एम एच 14/ सीसी 9329) निघाले होते. स्कार्पीओ मोहोळ पंढरपूर मार्गावरील पेनूर शिवारातील माने यांच्या शेताजवळील वळणावर येताच पलटी झाली. त्यात प्रदीप पवार गंभीर जखमी होऊन जागीच मृत पावले. या घटनेची फिर्याद विनोद खंडेराव कदम (33) रा सांडगेवाडी यानी मोहोळ पोलिसात दिली. संदेश संभाजी वेताळ (चालक) रा सुर्डी ता कराड, याच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान त्या ठिकाणी दुसरा अपघात होऊ नये म्हणून पोलीसांनी स्कार्पीओ तातडीने सरळ केली. या घटनेचा अधिक तपास हवालदार अविनाश शिंदे करीत आहेत.

Web Title: Scorpio accident in Mohol and one killed