औदुंबर येथील श्री दत्त मंदीर सील...

AUDUMBAR TEMPLE.jpg
AUDUMBAR TEMPLE.jpg

अंकलखोप (सांगली)- पलुस तालुक्‍यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पलुसचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी औदुंबर येथिल श्री दत्त मंदीर पुर्णपणे बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पुर्वी मंदिर लॉकडाऊनमुळे बंद होतेच पण अनेक भक्त मंदीर परिसरात विनाकारण गर्दी करतात. काहीजण बाहेरून का होईना मुखदर्शन घेण्यासाठी येत असल्याने ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. 

यापुढे मंदिर परिसरात दिसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. नुकतेच पलुस तालुक्‍यातील राजकिय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या व्यक्तीचा पोजिटिव्ह रिपोर्ट येण्याच्या 1 दिवस अगोदर संबंधीत व्यक्ती औदुंबर येथे विवाह सोहळ्याला येऊन गेली आहे. त्यामुळे औदुंबर परिसरातील नागरिकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या विवाह सोहळ्यात आचारी, वाडपी हे औदुंबर मधीलच आहेत.

विवाह सोहळ्यात आलेल्या पैकी कोणी बाधित होता काय याची तपासणी सुरु आहे. त्यामुळे संबंधीत कोरोना बाधित व्यक्तीमुळे वऱ्हाडी मंडळी, व जेवण विभागातील व्यक्ती यांना सद्यातरी कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी प्रत्येकांने काळजी घेतली पाहिजे. आणखी प्रसार होऊ नये यासाठी रविवारी (ता. 5) गुरू पोर्णिमेला औदुंबर परिसरात कोणीही फिरकू नये. व गर्दी करू नये अश्‍या सुचना आपत्ती व्यवस्थापन व श्री दत्त देवस्थान समितीने दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com