बेळगावमधील सीलडाउनचा निर्णय रद्द ; वाचा काय आहे निर्णय...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

लॉकडाऊन 4.0 मध्ये राज्य सरकारने घेतलेला दर रविवारचा सीलडाऊनचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी (ता.31) बेळगाव सुरू राहणार असून सकाळी सात ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी हा निर्णय दिला आहे. 

बेळगाव ः लॉकडाऊन 4.0 मध्ये राज्य सरकारने घेतलेला दर रविवारचा सीलडाऊनचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी (ता.31) बेळगाव सुरू राहणार असून सकाळी सात ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी हा निर्णय दिला आहे. 

18 मे रोजी 4.0 लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. केंद्राच्या मार्गसुचीनुसार राज्याने लॉकडाऊनचे काही नियम शिथील केले होते. मात्र प्रत्येक रविवारी राज्यात सीलडाऊनचा निर्णय घेतला होता. राज्यातील लॉकडाऊननुसार रोज सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत व्यवहार सुरू ठेवले जात असून सायंकाळी सात ते दुसऱ्यादिवशी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली जात आहे. त्यातच शासनाने घेतलेल्या रविवारच्या सीलडाऊन निर्णयाप्रमाणे शनिवारी सायंकाळी सात वाजता लागू होणारी संचारबंदी थेट सोमवारी सकाळी सात वाजता उठत होती त्यामुळे 36 तास शहर बंद राहात होते. 

मागील रविवारी या नियमाप्रमाणे शहरासह संपूर्ण राज्य बंद ठेवण्यात आले होते मात्र मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून रविवारचा सीलडाऊनचा निर्णय रद्द केला आहे. राज्याचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी आज (ता. 30) सकाळी याबाबतचा आदेश जाहीर केला असून यात रविवारी होणारा सीलडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र इतर दिवसांप्रमाणे रविवारी सकाळी सात वाजता नियमीत व्यवहार सुरू झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता संचारबंदी नेहमीप्रमाणे लागू असणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sealdown decision canceled in Belgaum

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: