तलवारीने केक कापणाऱ्या आरसी गॅंगच्या गुंडांचा शोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

कोल्हापूर - सुभाषनगरात भर रस्त्यावर वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून दहशत माजविणाऱ्या आरसी गॅंगच्या गुंडांचा राजारामपुरी पोलिस शोध घेत आहेत. काल रात्री उशिरा आर.सी. गँगच्या गुंडांनी हा प्रकार केला होता. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संशयितांची शोधमोहीम सुरू होती.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी (ता. ३१) रात्री सुभाषनगरात रस्त्यावर तलवारीने केक कापून आरसी गॅंगने वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ‘आरसी गॅंग जिंदाबाद, हमसे जो टकरायेगा, मिट्ठी मे मिल जायेंगा...’ अशा घोषणा दिल्या होत्या. याप्रकरणी काल राजारामपुरी पोलिसांत १४ संशयितांवर गुन्हा दाखल झाला. यात केदार सातपुते, गणेश पंडित बामणे, प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, योगेश पाटील, जावेद सय्यद, साई संभाजी कांबळे, शुभम दीपक मुळीक, अमित अंकुश बामणे, सनी राम साळे, सागर प्रभूदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, रवी सुरेश शिंदे, सागर सोनवणे (सर्व सुभाषनगर) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बंदी आदेशाचा भंग करून दहशत माजवत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. 

Web Title: search of RC Gang hooligan in Kolhapur