संगमनेर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के 

आनंद गायकवाड       
रविवार, 19 ऑगस्ट 2018

आश्वी : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव परिसरात शनिवार ( ता. 18 ) च्या रात्री भूगर्भातील हालचालीमुळे सौम्य धक्के जाणवले असले तरी, नाशिक येथील मेरी केंद्रातील भूकंपमापन यंत्रावर यांची नोंद झालेली नाही. 

घारगाव परिसरात शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सात मिनीटांपर्यंत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थ ज्ञानेश्वर आहेर, सोपान गाडेकर, पप्पू सय्यद, मंगेश कान्होरे, महेश आहेर, कल्पेश आहेर यांनी दिली. बोटा व परिसरात गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा भुकंपसदृष्य धक्के यापूर्वी जाणवले होते.

मात्र काल घारगाव परिसरात पहिल्यांदाच भुगर्भातील हालचाली जाणवल्याच्या घटनेमुळे परिसराट घबराट पसरली आहे. मात्र बाबत नाशिकच्या मेरी केंद्रातील भूकंपमापन यंत्रावर या धक्क्यांची नोंद झाली नसल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक चारूलता चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Seasonal earthquake strikes in Sangamner taluka