भाजपच्या दुसऱ्या यादीतही दिग्गज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - छत्रपती घराण्यातील दोन दिग्गजांनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतही जिल्ह्यातील दिग्गजांची नावे आहेत. 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्यातच नावांची घोषणा होईल. सध्या अशांची यादी करण्याचे काम सुरू असून यानिमित्ताने जिल्ह्याचे राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे.
 

कोल्हापूर - छत्रपती घराण्यातील दोन दिग्गजांनंतर भारतीय जनता पक्षात प्रवेशाच्या दुसऱ्या यादीतही जिल्ह्यातील दिग्गजांची नावे आहेत. 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात होणाऱ्या मेळाव्यातच नावांची घोषणा होईल. सध्या अशांची यादी करण्याचे काम सुरू असून यानिमित्ताने जिल्ह्याचे राजकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे.
 

"सत्तेसोबत सारे जण‘ हे राजकारण आताच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे. राज्यात 1999 मध्ये दोन्ही कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतरही इतर पक्षांतील अनेक दिग्गज कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन नाचू लागले. दोन वर्षांपूर्वी देशात भाजप सत्तेवर आल्यानंतर राज्यातही सत्तापरिवर्तनाची लाट दिसू लागल्याने दोन्ही कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपात उडी मारली. किमान पाच वर्षे तरी राजकीय सोय झाली, हीच भावना त्या मागे होती. अजूनही पक्षप्रवेशाचा हा सिलसिला चालूच राहणार आहे.

छत्रपती शाहू महाराजांचे वारस युवराज संभाजीराजे यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदारकी देऊन भाजपच्या गोटात आणले. त्यांनी अजून थेट पक्षात प्रवेश केला नसला तरी मी त्या पक्षात नाही, असेही ते सांगू शकत नाहीत अशी स्थिती आहे. त्यांच्यानंतर "शाहू-कागल‘चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हेही भाजपवासी झाले. त्यांना तर पक्षप्रवेशानंतर लगेच राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले म्हाडाचे अध्यक्षपद दिले गेले. जिल्ह्यात अनेक जण भाजपच्या वाटेवर असून त्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे, त्या दिवशी राजकीय भूकंपच असेल, असे पालकमंत्री पाटील सांगत आहेत. आगामी यादीत कोण कोण याची उत्सुकता राजकीय क्षेत्रात लागून राहिली आहे.

गडहिंग्लज कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी यापूर्वीच "कमळ‘ हातात घेतले आहे. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे, "दत्त-शिरोळ‘चे अध्यक्ष गणपतराव पाटील अशी त्यातील काही नावे आहेत. 5 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काही दिग्गज पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांची नावे मात्र गुलदस्त्यात ठेवली जात आहेत. "जनसुराज्य‘चे संस्थापक विनय कोरे थेट पक्षात प्रवेश करणार नाहीत; पण आगामी निवडणुकीत त्यांची भाजपसोबत आघाडी असणार आहे.

Web Title: The second lists the veteran BJP