अक्कलकोटला भुकबळीच्या विरोधात 'रॉबिन हुडची ' दुसरी चळवळ

राजशेखर चौधरी
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

अक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी 'या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे.ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत पोचवणार आहे.

अक्कलकोट : अक्कलकोट येथे भूकबळीच्या विरोधात जयहिंद फूडबँकने सुरू केलेल्या चळवळी नंतर आता दुसरी 'राॅबिनहुड आर्मी 'या नावाने युवकांनी दुसरी चळवळ सुरू केली असून त्याची स्थापना मैत्री दिनी करण्यात आली आहे.ही संस्था सुद्धा शहरातील विविध कार्यक्रम व अनेक ठिकाणी वाया जाणारे अन्न खरोखरच गरजू पर्यंत पोचवणार आहे. त्यामुळे  अक्कलकोट शहरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर जादा झालेले अन्नाची नासाडी सुद्धा थांबणार आहे. ही आर्मी जगभरातील १७ विविध देशांमध्ये कार्यरत आहे. त्याची शाखा अक्कलकोटमध्ये व्हावी अशी अनेकांची इच्छा होती. त्याला रशीद खिस्तके या तरुणांने पुढाकार घेऊन मूर्त स्वरूप प्राप्त करून दिली आहे.शहरात मैत्री दिनाच्या औचित्याने १६० जणांना अन्नदान करुन सुरुवात करण्यात आली.

शिल्लक असलेले जेवण टाकुन देण्यापेक्षा ते गोरगरीबांची भूक भागविण्यासाठी कामी यावे या उद्देशाने राॅबिनहुड आर्मीची सुरुवात अक्कलकोटमध्ये करण्यात आली, असे राॅबिनहुड आर्मी अक्कलकोटचे समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी सांगितले. १ ऑगस्टला अक्कलकोट येथे आम्ही याची सोशल मिडियाद्वारे सुरुवात केली आणि या ग्रुपमध्ये १४३ स्वयंसेवकांनी स्वईच्छेने सहभाग नोंदविला आहे. त्याला अक्कलकोट येथील लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळाने प्रतिसाद देत त्वरेने दखल घेत मैत्री दिनाचे औचित्य साधुन अनेक तरुणांना सोबतीला घेत १६० जणांचे जेवण अक्कलकोट शहरातील स्वामी समर्थ समाधी मठ, शेख नुरदीन दर्गा, कांदा बाजार, एस टी स्टॅड या परिसरातील गोरगरीबापर्यंत पोहोचविण्याचे काम करुन अक्कलकोट शहरामध्ये एक सामाजिक संदेश दिला आहे.

सदर अन्नवाटपासाठी अक्कलकोट  शहरातील संजय जमादार, सागर शिरसाठ, अनंत क्षीरसागर, बाळा वाघमारे, छोटु कोळी, आकाश शिंदे  या स्वंयसेवकांनी परिश्रम घेतले. अक्कलकोट शहरामध्ये लग्नकार्यात, घरगुती कार्यात व हाॅटेलमध्ये 
अन्न शिल्लक राहिल्यास ९०४९१२३३३६,९९६००७०७३९ या क्रमांकावर कळवावे असे आवाहन समन्वयक रशिद खिस्तके व देविदास गवंडी यांनी केले आहे.राॅबिनहुड आर्मी अक्कलकोट याला प्राचार्य हिंदुराव गोरे व प्रा. अनिकेत चनशेट्टी हे मार्गदर्शन करत आहेत.

Web Title: The second movement of Robin Hood against stravation in Akkalkot's