सुरक्षित प्रसूतीसाठी ‘माहेरवाशीण’

Woman-Delivery
Woman-Delivery

सातारा - घरी होणाऱ्या प्रसूती थांबविणे, दुर्गम भागातील महिलांना सुरक्षित प्रसूती सेवा देऊन माता मृत्यूदर, नवजात मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘माहेरवाशीन’ आरोग्य केंद्राची’ ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एका प्रसूतीसाठी साधारणपणे सहा हजार ६०० रुपयांचा खर्च अपेक्षित धरला असून, ही योजना दुर्गम भागातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील गरोदर मातांची बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रांपर्यंत पोचविण्यासाठी अडचणी येत असतात. काही वेळा अतिवृष्टी, पूरपरिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्ती, तसेच दुर्गम भागात वाहनांची कमतरता अशा समस्यांमुळे गरोदर महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

परिणामी, घरात प्रसूती होण्याची प्रमाण कमी होत नाही. माता मृत्यू, बालमृत्यू, अर्भकमृत्यूचे प्रमाण दुर्गम भागात जास्त राहात आहे. ते थांबविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत असतो. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माहेरवासीन आरोग्य केंद्राची’ ही योजना राबविण्यात येणार असून, त्यास मान्यता मिळण्यासाठी आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

संबंधित गरोदर महिलेला आरोग्य संस्थेमध्ये प्रसूतीसाठी प्रसूतीपूर्वी सात दिवस दाखल करून घेणे, प्रसूतीनंतर तीन दिवसांपर्यंत तिची व बाळाची माहेरी ज्या पद्धतीने संगोपन केले जाते, अशा प्रकारची काळजी घेणे, त्यांची राहण्याची, जेवणाची, तपासणी व औषधोपचाराची सोय मोफत करणे, तिची प्रसूती वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे, सुरक्षित बाळंतपण करून माता व बालकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी करण्यासाठी ही योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील जनतेला अत्यावश्‍यक सेवा तत्काळ उपलब्ध होतील, तसेच त्यांच्या आर्थिक ताण पडणार नाही, हा योजनेचा मुख्य हेतू आहे.

योजनेअंतर्गत पीएचसी
सळवे, मोरगिरी, मुरुड, हेळवाक, सणबूर, केरळ, तारळे (ता. पाटण), परळी, ठोसेघर (ता. सातारा), बामणोली, कुसुंबी, केळघर (ता. जावळी), तापोळा, तळदेव (ता. महाबळेश्‍वर), मालतपूर (ता. वाई).

एका गरोदर मातेसाठीचा खर्च (रुपयांत)
 माता व बालकाला साहित्यसामुग्री किटचा पुरवठा :     ५००
 दैनंदिन आहार (दहा दिवसांसाठी प्रती दिन १५०) :     ३०००
 गरोदर माता ने- आण करण्यासाठी वाहनास इंधन :     २०००
 गरोदर महिलेच्या नातेवाईकांला बुडीत मजुरी :     १०००
 आशांना प्रत्येक प्रसूतीसाठी विशेष अनुदान :     १००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com