दहशतवादी हल्ल्यानंतर पंढरपुरात सुरक्षाव्यवस्था अधिक कडक

Pandharpur
Pandharpur

पंढरपूर : दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशतवादींनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज माघी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

पदस्पर्श दर्शनासाठी विठ्ठल गाभाऱ्यात जाणाऱ्या भाविकांची कसून चौकशी व तपासणी करूनच सोडले जात आहे. पोलिसांच्या तपासमीमुळे दर्शनाची रांग संथ गतीने सुरू आहे. आज माघी यात्रेसाठी पंढरपुरात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून सुमारे चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. यात्रेच्या बंदोबस्तासाठी या पूर्वीच सुमारे 1100 पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी पुलवामा येथे दहशदवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर आत्मघातकी बाॅम्ब हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 49 जवान शहीद झाले आहेत. या घटनेनंतर राज्याच्या गृहविभाने महत्वाच्या मंदिराच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सकाळ पासून तीन वेळा  डाॅग स्काॅड आणि बाॅम्ब शोधक पथकाने मंदिराची तपासणी केली आहे. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची मेटल डिटेक्टर आणि स्कॅनरच्या सहायाने तपासणी केली जात आहे. सुरक्षेसाठी उस्मानाबादहून जादा एक डाॅग स्काॅड पाचारण करण्यात आले आहे.

याशिवाय कोल्हापूरहून एसआरपीच्या  दोन तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. मंदिर परिसर, नामदेव पायरी, वाळवंट आणि दर्शनबारी आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाढीव पोलिस अधिकारी व कर्मचारी शेजारील पुणे सातारा सांगली या भागातून बोलावण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.सागर कडवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com