मंगळवेढ्यात शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला

हुकूम मुलाणी
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा म्हणून त्या विद्यार्थ्यांची बसमधून ने-आण केली जाते. पण अजूनही काही जीप, टमटम यांचा वापर केला जातो. यामुळे आतापर्यंत अनेकदा अपघातही झाले असून, उपप्रादेशीक परिवहन खात्याच्या दुर्लक्षाने ही बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक सुरूच आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर संस्थेला व परिवहन खात्याला जाग येणार का असा सवाल यामुळे उपस्थित झाला आहे.

बसमध्ये २८ प्रवाशांची आसन क्षमता असताना एका माध्यमिक विद्यालयाच्या स्‍कूलबसमधून १०९ विद्यार्थ्यांची वाहतूक करताना कारवाई केल्यावर ही बस पुणे येथील असून, त्याची नोंद सोलापुरात करण्यात आली नसल्याचे समोर आले. त्यांच्याकडे विद्यार्थी वाहतूकीचा परवानादेखील नसल्याचे समोर आले. शिवाय दक्षिण भागात माध्यमिक शाळेची बस पलटी झाल्याने शाळेतील सेवकाला जीव गमवावा लागला व विद्यार्थी जखमी झाले..तर कचरेवाडीच्या इंग्लिश मेडीयमची बस झाडावर आदळून विद्यार्थी जखमी झाले. या तीन घटना घडूनही पालक व संस्था जागृत झाल्या नाहीत. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकाना शहरी शिक्षणाचे वेध लागल्याने ठरावीक रक्कम दयमहा भरून विद्यार्थी मंगळवेढ्यात पाठवू लागले आहेत. यामध्ये शहरातील अनेक मराठी व इंग्रजी माध्यमाचा समावेश असून  शहरातील व तालुक्यातील सुरू असणाऱ्या शाळांमध्ये अवैध स्कूल बसचा वापर केला जात आहे.

न्यायालयाच्या सूचनेनुसार उन्हाळ्याच्या सुटीमध्ये आरटीओ कार्यालयाकडे नोंद असलेल्या स्कूल बसेसची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. जिल्ह्यात ४६६४ शाळा असून २८५३ शाळांमध्ये स्कूलबस समिती गठीत करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुटीमध्ये बसेसची तपासणी करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. उर्वरीत बसेस तपासणीसाठी आल्या नसल्यामुळे या बसेसवर कारवाई करण्याची मोहिम सुरु करण्याची गरज आहे. दोन दिवसापूर्वी मंगळवेढ्यातील माध्यमिक शाळेची विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या जीपचे टायर निघाले सुदैवाने कोणत्याही प्रकारची इजा विद्यार्थ्यांना झाली नाही. पण आता तरी संस्था व पालक जागृत होतील का असा सवाल विचारला जावू लागला आहे.

Web Title: The security of school students in the Mangaldas