लग्न ठरलयं? मग या पत्रिका पहाच 

प्रशांत देशपांडे
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

- बॉक्‍स, फॅन्सी लग्नपत्रिकांना मागणी 
- डिजिटल लग्नपत्रिकेचा व्यवसाय तेजीत 

सोलापूर : लग्नसराईचा सध्या हंगाम सुरू आहे. पूर्वी लग्नपत्रिका साधी एका रंगात छापून घेत. त्यानंतर चार रंगात छापून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या डिजिटलसह बॉक्‍स व फॅन्सी लग्नपत्रिका छापून घेण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे चित्र बाजारात पाहण्यात येत आहे. 

धकाधकीच्या जमान्यात घरोघरी जाऊन लग्नपत्रिका देणे शक्‍य नसल्याने जवळचे नातेवाईक किंवा ज्यांना पत्रिका देणे गरजेचे आहे अशांनाच प्रत्यक्षात जाऊन देत आहेत. त्याचबरोबर मित्रमंडळी, घर लांब किंवा परगावी असलेल्या नातेवाइकांना लग्नाच्या वेळेपर्यंत पत्रिका पोचणार नाही अशांना व्हॉटसऍपद्वारे पत्रिका पाठविण्यात येत आहे. आज डिजिटलच्या जमान्यात लग्नपत्रिका छापून नातेवाइकांच्या, मित्राच्या घरी जाऊन देण्याचे प्रमाण तेवढेच आहे. सध्या सोशल मीडिया आणि व्हॉटसऍपद्वारे लग्नपत्रिका पाठविण्याची पद्धत वाढली असली तरी त्याची क्रेझ अजून सोलापुरात रुजली नाही. 

हेही वाचा : बापरे! माकडाने हे काय केले? 

 
 

या पत्रिकांना सर्वाधिक मागणी 
मात्र, सध्या लग्नपत्रिका सोबतच बॉक्‍स आणि फॅन्सी लग्नपत्रिकेला जास्त मागणी असली तरी त्यात दोन प्रकार आहेत. मोठ्या आणि जवळच्या लोकांना देण्यासाठीची वेगळी आणि इतरांना देण्यासाठी साधी लग्नपत्रिका छापून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. एका लग्नपत्रिकेची किंमत 20 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. सध्या पॅड स्वरूपातील बॅग पत्रिकांना जास्त मागणी आहे. तर ग्रामीण भागात चार रंगांतील पत्रिका त्यावर वधू-वरांचे फोटो, नेत्यांचे फोटो, देव-देवतांचे फोटो छापून पत्रिका घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

हेही वाचा : शिवसेना खासदारांच्या राज्यसभेत जागा बदलल्या; महाशिवआघाडीचे दिल्लीत पडसाद 

फेसबुक, व्हॉट्‌सअपद्वारे पत्रिका 
डिजिटलच्या जमान्यात फेसबुक, व्हॉटसऍप यांच्यासह सोशल मीडियावर लग्नपत्रिका टाकताना वधू-वरांचे फोटो तसेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करून टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच डिजिटल पत्रिकेत फक्त वधूवरांचे नाव आणि पत्ता नमूद केलेला असतो. सुटसुटीत आणि आकर्षित लग्नपत्रिकेचा ट्रेंड सध्या दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See atractive Wedding card