ढगांच्या अडथळ्यानंतर 'अंबाबाई किरणोत्सव' दुसऱ्या दिवशी यशस्वी; फोटो पाहिलेत का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

देवस्थान समितीने जाहीर केलेल्या तारखांनुसार किरणोत्सवाच्या कालच्या पहिल्या दिवशी ढगांच्या अडथळ्यामुळे किरणे दुसऱ्या पायरीपर्यंत पोचली होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.9) मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली.

Image may contain: indoor

- Ayodhya Verdict : अयोध्या निकालामुळे पाकिस्तानच्या पोटात दुखतंय!

देवस्थान समितीने जाहीर केलेल्या तारखांनुसार किरणोत्सवाच्या कालच्या पहिल्या दिवशी ढगांच्या अडथळ्यामुळे किरणे दुसऱ्या पायरीपर्यंत पोचली होती. मात्र, शनिवारी सायंकाळी आकाश निरभ्र राहिल्याने सूर्यकिरणांचा अपेक्षित प्रवास झाला. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होवू लागले आहे.

Image may contain: indoor

- Ayodhya Verdict : राम मंदिराचे पुरावे शोधणारा 'मुस्लिम' हीरो..

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, राजेंद्र जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. मंदिर परिसरात देवस्थान समितीने तीन एलईडी स्क्रीन लावल्याने भाविकांना मंदिराच्या बाहेरही किरणोत्सवाचा सोहळा अनुभवायला मिळाला. 

Image may contain: 1 person, sitting, standing, crowd and outdoor

सायंकाळी पाच वाजून 18 मिनिटांनी सूर्यकिरणांनी गरूड मंडपात प्रवेश केला. त्यानंतर पाच वाजून 32 मिनिटांनी कासव चौकात, तर त्यानंतर चार मिनिटांनी पितळी उंबऱ्यापर्यंत प्रवेश केला. पाच वाजून 41 मिनिटांनी किरणे पहिल्या पायरीपर्यंत पोचली. त्यानंतर आठ मिनिटांचा प्रवास करत ती मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचली आणि डावीकडे सरकली.

- विवाहासाठी यंदा 46 मुहूर्त : पाहा कोणते...

दरम्यान, यंदाच्या सोहळ्यात पहिल्यांदात किरणांची तीव्रता अधिक जाणवत असून उद्या (ता. 10) मूर्तीच्या गळ्यापर्यंत किरणे पोचतील, अशी अपेक्षा असल्याचे प्रा. मिलिंद कारंजकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See these photos of the second day of the Ambabai Kirnotsav festival in Kolhapur