जप्त नोटा प्रकरणाची "प्राप्तिकर'कडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

कोल्हापूर - सातारा येथे पकडलेल्या 60 लाखांच्या नोटा प्रकरणाची प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी पकडलेल्या तिघांच्या बॅंक खात्यांची, तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. त्यांनी आपल्या खात्यावर जुन्या नोटा किती भरल्या आणि त्यांच्याकडे नवीन नोटा आल्या कोठून याची सखोल चौकशी होणार आहे.

काल सातारा पोलिसांनी सागर दत्तात्रेय आरडे, भगवान विरप्पा भोपळे आणि उमेश मधुकर कांबळे या तिघांना अटक करून 60 लाखांच्या नोटा जप्त केल्या. यातील आरडे आणि भोपळे राजारामपुरीतील आहेत. तिघेही तीस टक्के कमिशनवर जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा ते देत होते. पोलिसांनी याची माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली आहे. पुण्यातील प्राप्तिकर विभागाचे अधिकारी याची चौकशी करणार आहेत.

या तिघांच्या मालमत्ता विवरणपत्रांची माहिती घेण्यास सुरवात झाली आहे. त्यांची बॅंक खाती, त्यांचे उद्योग यातून होणारी आर्थिक उलाढालीची माहिती प्राप्तिकर विभाग घेत आहे. त्यांच्या खात्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा आल्या कोठून, याचीही माहिती घेतली जात आहे.

Web Title: seized currency inquiry by income tax