esakal | घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सांगलीतील 89 गावांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Selection of 89 villages in Sangli for solid waste management project

स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी सांगली जिल्ह्यातील 89 गावांची निवड करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी सांगलीतील 89 गावांची निवड

sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील 89 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध उपक्रम राबवले जाणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली. 

घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोष्ट पिट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचरा कुंड्या देणे, सार्वजनिक कचरा कुंड्या बसवणे, कुटुंब स्तरावर कंपोष्ट खत निर्मिती करणे, गाव स्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोष्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी महत्त्वाचे विषय असणार आहेत.

सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंब स्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी विषय असणार आहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे. याशिवाय अन्य उपक्रमातून गावात स्वच्छता नांदावी, यासाठी काम केले जाईल, असे सौ. कोरे यांनी सांगितले. 


योजनेतील गावे अशी

  • शिराळा तालुका : सागाव, बिळाशी, मणदूर, वाकुर्डे बुद्रुक, पुणदीतर्फ वारूण, मणदूर, अस्वलवाडी, कुसाईवाडी 
  • मिरज तालुका : बेडग, आरग, म्हैसाळ, कसबेडिग्रज, नांद्रे, दुधगाव, हरिपूर, तुंग, कर्नाळ, अंकली, मौजे डिग्रज, सावळी, वड्डी, विजयनगर, माधवनगर, बामणोली, कवलापूर, बुधगाव, मालगाव. 
  • कडेगाव तालुका : वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, नेवरी, मोहिते वडगाव. 
  • पलूस तालुका : रामानंदनगर, दुधोंडी, नागठाणे, आमणापूर, वसगडे, पुणदी, ब्रह्मनाळ, सावंतपूर 
  • तासगाव तालुका : मणेराजुरी, येळावी, सावळज, चिंचणी, सावर्डे, शिरगाव कवठे. 
  • खानापूर तालुका : भाळवणी, नागेवाडी, माहुली, पारे, खंबाळे भाळवणी, चिंचणी मांगरूळ. 
  • कवठेमहांकाळ तालुका : देशिंग, कुची, नागज, कुकटोळी, आगळगाव, नांगोळे, बोरगाव 
  • जत तालुका : उमदी, बिळूर, संख, डफळापूर, उमराणी, आसंगी 
  • आटपाडी तालुका : आटपाडी, करगणी, खरसुंडी, शेटफळे, बनपुरी, हिवतड, नेलकरंजी, तडवळे, माडगुळे. 
  • वाळवा तालुका : वाळवा, कासेगाव, नेर्ले, बोरगाव, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, रेठरे हरणाक्ष, शिगाव, तांबवे, ताकारी, बहे, नवेखेड, नरसिंहपूर, तांदूळवाडी.

संपादन : युवराज यादव