बचत गटांना साह्य करणार बॅंक सखी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

सातारा - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटांच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यांना विविध बॅंकांमार्फत कर्ज पुरवठाही केला जातो. कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभतेने व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणामार्फत बॅंक सखी नेमल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५५ बॅंक सखी नेमल्या जाणार असल्याने बचत गटांतील महिलांना कर्ज मिळणे सुकर होईल.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचतगट स्थापन करण्यात आले आहेत. त्या बचत गटांना कर्ज देऊन त्यामार्फत विविध व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा बॅंकेमार्फत कर्ज दिले जात असल्याने अनेक महिलांच्या जीवनात आर्थिक बदलही झाले आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत अशा महिला बचत गटांसाठी प्रदर्शन भरवून त्यांच्या उत्पादनांची विक्री होण्यास मदत करत असतात. मात्र, या बचत गटांतील महिलांना कर्ज घेताना बॅंकांच्या प्रक्रियेच्या अडचणीही सोडवाव्या लागतात. अनेकदा कर्ज प्रक्रिया पाहून कर्ज घेण्याविषयी नाराजी दर्शवितात. कित्येकांना ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बचत गटांना कर्जही मिळत नाही. त्यामुळे महिलांचा आर्थिक विकास होत नाही. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून बॅंक सखी नेमणार आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ५५ बॅंक सखी नेमणार आहे. यासाठी १५० अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १०५ महिला परीक्षेसाठी उपस्थित होत्या, अशी माहिती अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी दिली.

पाच दिवस काम
बॅंक सखींना ११ महिन्यांच्या करारावर नेमणूक दिली जाणार असून, त्यांना पाच दिवस बॅंकांच्या शाखेमध्ये काम करावे लागणार आहे. त्यासाठी तीन हजार रुपये त्यांना मासिक मानधन दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात ही संख्या वाढविली जाणार आहे.

Web Title: Self Help Group Support by Bank Sakhi