मोहोळ : मोहोळ शहरासह ग्रामीण भागातील चोऱ्या रोखण्यासाठी मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी नवीनच असा सेल्फी विथ पोलिस हा उपक्रम सुरू केला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बहुदा हा पहिलाच उपक्रम आहे.
सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे उकाडा मोठ्या प्रमाणात आहे. घरात पंखे सुरू करून जरी झोपले तरीही उकाडा कमी होत नाही. त्यासाठी नागरिक घराचे दरवाजे बंद करून गच्चीवर झोपतात. त्याचा फायदा चोरटे घेतात, झोपेत असल्यानंतर मध्यरात्री चोऱ्या होतात पहाटे किंवा सकाळी झोपेतून उठून खाली आल्यावरच आपल्या घरात चोरी झाल्याचे घर मालकाचे लक्षात येते. त्यामुळे चोरीचा तक्रारीत वाढ होते.
यावर मोहोळ पोलिसांनी नामी उपाय शोधला आहे. प्रत्येक गावातील ग्राम सुरक्षा दलाच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या त्या बीट मधील हवालदाराने व पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या गावात जाऊन पोलिस पाटील व नागरिकांना झोपेतून उठवायचे. त्यांच्या सोबत चर्चा करावयाची तसेच त्यांच्या सोबत सेल्फी काढून तो फोटो पोलिस ग्रुप वर अपलोड करावयाचा. त्यामुळे अधिकाऱ्यांच्याही लक्षात येते की, आपला पोलीस त्याच्या बीटमधील गावात आहे. तसेच मध्यरात्रीच्या वेळी पोलिस गाडीचा सायरन वाजविला जातो. त्यामुळेही नागरिक सतर्क होत आहेत. चोऱ्या होण्यास या उपक्रमामुळे बरासा पायबंद बसला असल्याचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले.
सूर्यकांत कोकणे पोलीस निरीक्षक मोहोळ पोलिस ठाणे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस आहेतच. परंतु नागरिकांनीही काळजी घेतली पाहिजे. झोपताना कुलुप व्यवस्थित लावणे मोठी रक्कम वा सोने-नाणे बँकेत अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत काळजी घेतली तर चोरिला पायबंद बसणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.