'लागिरं झालं जी' फेम राहुल्या व जम्यानं जिंकली भांडवलीकरांची मनं

रुपेश कदम
सोमवार, 30 एप्रिल 2018

मलवडी (सातारा) : माण तालुक्याच्या गावागावात जलसंधारणाच्या कामासाठी श्रमदानाचे उधाण आले आहे. या श्रमकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न मान्यवरांकडून सुरु आहे.

काल 'लागिरं झालं जी' मालिकेतील लोकप्रिय पात्र राहुल्या (राहुल मगदूम) व जम्या (अमरनाथ खराडे) यांनी तेलदरा (भांडवली) येथील ग्रामस्थांसोबत श्रमदान करुन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.

भांडवली ग्रामपंचायत अंतर्गत भांडवली व तेलदरा येथे अतिशय जोरदार काम सुरु आहे. दररोज सकाळी सहा वाजलेपासून साडेनऊ वाजेपर्यंत तसेच सायंकाळच्या सत्रात आबालवृद्ध, तरुण-तरुणी श्रमदानाचे काम करत आहेत. हे काम पाहण्यासाठी व लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी राहुल्या व जम्या आले होते. राहुल्याने हातात टिकाव घेवून जमीन खोदली तर जम्याने खोरे हातात घेऊन माती घमेल्यात भरली. दोघांनीही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात श्रमदानाचे काम करुन लोकांचा उत्साह वाढविला. राहुल्या व जम्याला पाहून उपस्थित महिला, युवती व तरुणांचा आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, नायब तहसीलदार अमोल कदम, आप्पासो बोराटे, संतोष बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

"माणुसकी हाच धर्म व माणुसकी हीच जात समजून सुरु असलेले श्रमदानाचे काम पाहून मी भारावून गेलो. श्रमदानातून अशी एकता होते असेल तर असं श्रमदान करायला मी एकदा नाही तर लाख वेळा जाईन." असे राहुल मगदूम याने सांगितले. 

Web Title: serial lagira zal ji fem rahulya and jamya wins hearts of bhandvali villagers