शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना भुर्दंड

शिवाजी विद्यापीठाच्या सर्व्हर डाऊनचा विद्यार्थ्यांना भुर्दंड

कोल्हापूर - एमएस्सी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरायचे आहेत, मात्र तीन दिवस विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना शुल्क भरता आलेले नाही.

दरम्यान, प्रवेशाची मुदत संपली. कारण नसताना दोनशे रुपये विलंब शुल्क भरून प्रवेश परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. म्हणजे सर्व्हर डाऊन विद्यापीठाचा आणि भुर्दंड मात्र विद्यार्थ्यांना अशीच स्थिती झाली आहे.

सध्या शिवाजी विद्यापीठात विविध शाखांच्या पदव्युत्तर पदवीकेसाठी प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. एमएस्सीसाठी जी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्याचे अर्ज ऑनलाईन भरायचे असून, तीनशे रुपये शुल्कही ऑनलाईनच जमा करायचे आहे. यासाठी १७ एप्रिल ते ४ मे असा कालावधी होता, मात्र २ ते ४ मे या कालावधीत विद्यापीठाचा सर्व्हर बंद होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना तीनशे रुपये शुल्क भरता आलेले नाही. त्यामुळे त्यांचे प्रवेश परीक्षा अर्ज स्वीकारले गेले नाहीत. विद्यार्थ्यांना ओ.टी.पी क्रमांक मिळालेला नाही.  आता त्यांना प्रवेश अर्ज भरायचे असतील तर पाचशे रुपये विलंब शुल्क भरून प्रवेश अर्ज भरावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी तक्रारही केली; पण दखल घेतलेली नाही.

मी ‘एमएस्सी’ साठी प्रवेश परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरला, मात्र सर्व्हर डाऊन असल्याने मला तीनशे रुपये शुल्क भरता आले नाही. पुन्हा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी.
- रोहित करचे,
विद्यार्थी गडहिंग्लज

एक दिवस सर्व्हर डाऊन होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना ओटीपी क्रमांक मिळालाच नाही. अद्याप याबाबतची तक्रार आलेली नाही, मात्र  याबाबतची अधिक माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ. 
- डॉ. डी. टी. शिर्के
(प्र-कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com