शिर्डी विमानतळावरील सेवा झाली विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) नसल्याने काकडी येथील शिर्डी विमानतळावरील सेवा आज दिवसभर विस्कळित होती. येणारी व जाणारी प्रत्येकी 14 विमाने रद्द झाल्याची माहिती विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. 
शिर्डी विमानतळ परिसरात आज सकाळपासूनच वातावरण खराब होते. त्यामुळे दिवसभरात येथून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही, तसेच विमानतळावर एकही विमान उतरविले नाही

पोहेगाव (नगर ): दृश्‍यमानता (व्हिजिबिलिटी) नसल्याने काकडी येथील शिर्डी विमानतळावरील सेवा आज दिवसभर विस्कळित होती. येणारी व जाणारी प्रत्येकी 14 विमाने रद्द झाल्याची माहिती विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. 
शिर्डी विमानतळ परिसरात आज सकाळपासूनच वातावरण खराब होते. त्यामुळे दिवसभरात येथून एकाही विमानाचे उड्डाण झाले नाही, तसेच विमानतळावर एकही विमान उतरविले नाही. येथे येणाऱ्या विमानांचे "लॅंडिंग' इतरत्र झाले. येणारी 14 व जाणारी 14, अशा 28 विमानांची सेवा दिवसभर बंद होती. विमानसेवा विस्कळित झाल्याने शिर्डीला येणाऱ्या, तसेच येथून जाणाऱ्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. 

किमान अर्धा किलोमीटर दृश्‍यमानता असेल, तरच विमान धावपट्टीवर उतरणे शक्‍य होते किंवा उड्डाण घेता येते. दृश्‍यमानता कमी असेल, तर विमान उतरविणे शक्‍य नसते. येथील विमानतळावरून जाणारी विमाने रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. प्रवाशांचे पुढील सर्व नियोजन कोलमडले. ढगाळ वातावरणामुळे दृश्‍यमानतेवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. बाहेरून येथे येणारी विमाने इतरत्र वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. 

विकास खुंटला 

शिर्डी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील धार्मिकस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. देशाबरोबरच जगभरातून भाविक येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने हे विमानतळ तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याच्या विकासाकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्याचा विकास खुंटला आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Service at Shirdi Airport was shattered