सात लाखांची जनावरे चोरली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

मिरज - कर्नाटक पोलिसांनी पकडलेल्या जनावरे चोरणाऱ्या टोळीचे एकेक कारनामे आता उघडकीस येऊ लागलेत. आज मिरज ग्रामीण पोलिसात बेडग, सोनी येथील शेतकऱ्यांनी जनावरे, मेंढरे चोरल्याच्या तक्रारी दाखल केल्या. याच टोळीने जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांतही जनावरे चोरल्याचा पोलिसांचा संशय आहे.

मिरज - कर्नाटक पोलिसांनी पकडलेल्या जनावरे चोरणाऱ्या टोळीचे एकेक कारनामे आता उघडकीस येऊ लागलेत. आज मिरज ग्रामीण पोलिसात बेडग, सोनी येथील शेतकऱ्यांनी जनावरे, मेंढरे चोरल्याच्या तक्रारी दाखल केल्या. याच टोळीने जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांतही जनावरे चोरल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आज पहिली तक्रार सोनीच्या रवींद्र सुबराव पाटोळे यांनी दिली. त्यांनी म्हटले आहे, की 15 जून ते 8 ऑक्‍टोबर 2016 या कालावधीत त्यांच्या गोठ्यातून म्हशी, रेडके, शेळ्या आणि बोकडे अशी तब्बल चार लाख 10 हजार किमतीची जनावरे चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली. दुसरी तक्रार बेडग येथील पिंटू आप्पासो शेळके यांनी दाखल केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की 23 व 24 सप्टेंबर 2016 या कालावधीत 3 लाख 10 हजार किमतीच्या 18 मेंढ्या आणि 2 बकरी चोरीस गेल्या आहेत. आज कर्नाटकातील जनावर चोरणाऱ्या टोळीची माहिती मिळताच जनावरे चोरीस गेलेले शेतकरी तक्रारी दाखल करण्यास मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आले. त्यापैकी सोनी आणि बेडग येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी मिरज ग्रामीण पोलिसांनी दाखल करुन घेतल्या आहेत.

तीन-चार वर्षांपासून जनावरे चोरणारी टोळी मिरज पूर्व भागात कार्यरत आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात संघटितपणे येऊन तक्रारी देण्याचा प्रयत्न केला. काही गावांनी तर ग्रामसभांत चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करा, अशी मागणी करणारे ठरावही समंत केलेत. पण त्याकडे मिरज ग्रामीण पोलिसांनी दुर्लक्ष केले. मात्र कर्नाटक पोलिसांनी जनावरे चोरीचे प्रकार घडताच ही टोळी जेरबंद करुन 19 जनावरे जप्त केली. आठ जणांना अटकही केली. टोळीतील अन्य दहा जण अजून फरार आहेत. त्यांचा शोध मिरज ग्रामीण पोलिस घेत आहेत.
टोळीने केवळ मिरज पूर्व भागातच नाही तर वाळवा, इस्लामपूर परिसरातूनही जनावरे चोरल्याचा संशय पोलिसांना आहे.

Web Title: Seven lakh stolen cattle