अहमदनगरमध्येही अवतरली शाहीनबाग

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

 ""महात्मा गांधींच्या विचारधारेने देशातून ब्रिटिशांना देशाबाहेर काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराने सुधारीत नागरिकत्त्व कायदा मागे घेण्यासाठी भाग पाडू. हा कायदा जोपर्यंत मागे घेणार नाही, तो पर्यंत लढा सुरूच राहील. हा कायदा म्हणजे घटनेची पायमल्ली करणारा कायदा आहे

नगर ः देशभर सीएए कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. शाहीनबाग येथेही अनोख्या पद्धतीने आंदोलन केले जात आहे. त्याच्या समर्थनार्थ देशभर शांततापूर्ण वातावरणात आंदोलने सुरू आहेत. नगरमध्ये शाहीनबाग अवतरली होती. या आंदोलना अबाल-वृद्ध सहभागी झाले होते.

 ""महात्मा गांधींच्या विचारधारेने देशातून ब्रिटिशांना देशाबाहेर काढले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराने सुधारीत नागरिकत्त्व कायदा मागे घेण्यासाठी भाग पाडू. हा कायदा जोपर्यंत मागे घेणार नाही, तो पर्यंत लढा सुरूच राहील. हा कायदा म्हणजे घटनेची पायमल्ली करणारा कायदा आहे'' असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. 

 

शाहीनबाग आंदोलन १

आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची पोलीस कसून तपासणी करीत होते.

फकीरवाडा येथे सर्व धर्मीय बांधवांनी शाहीनबाग आयोजित करून नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. 
सप्तर्षी म्हणाले, ""मौलाना आझाद यांनी मुस्लिमांना सांगितले, की तुम्ही पाकिस्तानात गेला, तर तेथे फक्त मुस्लीम धर्मीय तुम्हाला भेटतील. परंतु; भारतात सर्वधर्मीय देशबांधवांची भेट होईल. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. सुधारीत नागरिकत्व कायदा भारतीय जनता पक्षाने केला.

 

shahinbagh 2

आंदोलनात सहभागी झालेले अबाल-वृद्ध

ज्या मतदारांनी भाजपला देशात सत्ता दिली. आज त्यांनाच नागरिकत्वाचा प्रश्‍न विचारला जातो. सर्वात प्रथम देशाच्या पंतप्रधानांनी सत्तेचा त्याग करावा. देशाच्या घटनेने सर्वांना देशाचे नागरिक म्हटले आहे. त्यामुळे त्यांचे नागरिकत्व रद्द करण्याचा कोणालाही अधिकार नाही. शहरातील सर्वधर्मीय माता भगिनींनी फकीरवाडा येथे नागरिकत्त्व कायद्याचा निषेध नोंदवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shaheenbagh agitation in Ahmednagar too