विद्रोही शाहिर शंतनू कांबळे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

आटपाडी (सांगली) : शेटफळे (ता. आटपाडी) येथील सुपुत्र विद्रोही शाहिर व जलसाकार शंतनू नाथा कांबळे (वय 40) यांचे नाशिक येथे निधन झाले. विद्रोही भूमित जन्मलेल्या या विद्रोही जलसाकाराची एक्झीट मनाला चटका लावणारी आणी विद्रोही चळवळीत पोकळी निमाॅण करणारी ठरली.                          

शाहिर शंतनूचे मूळ गाव आटपाडी तालुक्यातील शेटफळे होते. बालपण मूंबईत गेले होते. वडिलाची नोकरी गेल्यामुळे सारे कुटुंब गावाकडे आले. त्यामुळे शंतनूचे शिक्षणही गावातच झाले. शिक्षणात फारशी मजल मारता आली नाही. पुढे ते मूंबईला नोकरीसाठी गेले. तेथे ते विद्रोही साप्ताहिकांच्या संपादक मंडळाचे सदस्य आणी प्रकाशक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली, तसेच लिखाणही केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणी जलशासाठी राज्यभर भिरत होते. त्यांच्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक जलशांमध्ये ते सहभागी होत. मुंबईतील एका स्वयंसेवी संस्थेत ते अर्धवेळ काम करीत होते. तसेच नागपुरातील विनोबा विचार केंद्रसभागृहात अखिल भारतीय चर्चासत्रात सहभागी होत. त्यांचे नुकतेच नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने विद्रोही चळवळ एका कर्तबगार विद्रोहाला मुकली.

Web Title: shahir shantanu kamble death