Video : कोल्हापुरातील खड्ड्यांवर शाहिरी फटका

Shahiri Hammer On Pothole In Kolhapur News
Shahiri Hammer On Pothole In Kolhapur News

कोल्हापूर -

विकास कामाच्या पोकळ पाट्या 
काम कमीपर खादीला वाट्या 
डांबर बी नाई अन् खडी बी नाई 
नुसता खड्ड्यात मातीचा धूर 
केलं खड्ड्याचं कोल्हापूर.
..अशा शाहिरी फटक्‍यातून शाहीर दिलीप सावंत यांनी शहरातील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर आसूड ओढला. खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला येत असताना, खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष देणार कोण, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

"सकाळ'ने शहरातील खड्ड्यांवर प्रकाशझोत टाकल्यानंतर शाहिरीचा फटका प्रशासनाला चपराक देणारा ठरला. शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे आहेत. त्यातून मार्ग काढत चालताना नागरिक वैतागले आहेत. पावसाळ्यात रस्ते दुरूस्ती केली जात नाही, हे नागरिकांनी समजून घेतले.

पावसाने उघडीप दिल्यानंतर काही खड्ड्यांत मुरूम टाकण्यात आले. परतीच्या पावसाने ते वाहून गेले. पुन्हा याच खड्ड्यांतून नागरिकांना आता जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. शाहीर दिलीप सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्ड्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, खड्ड्यांवर शाहिरी फटका दिला. सकाळच्या शहर कार्यालयात येऊन त्यांनी शाहिरीचा सूर धरला.

"खड्ड्या-खड्ड्यात साचलयं पाणी,

डेंग्युच डास त्यात गातोय गाणी,

शेजाऱ्याची मेली हो तानी,

तिथं रडण्यात साऱ्यांचा सूर, केलं खड्ड्याच कोल्हापूर,'

यातून शहरात फैलावणाऱ्या आजारांवरही त्यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर

"खड्ड्या-खड्‌डयात आमचं मरण,

खड्ड्यात बांधल किती ते सरण,

कधी हो थांबणार खड्ड्यावर कुरणं,

कोण साहेब मिळणार शूर,

केलं खडड्‌याचं कोल्हापूर,'

असा ठसकेबाज प्रश्‍न उपस्थित करत नागरिकांची व्यथा मांडली. शाहीर समाधान कांबळे, शाहीर रत्नाकर कांबळे, पोपट वाघे (हार्मोनियम), सुरेश कांडगावकर (ढोलकी) यांनी त्यांना साथ दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com