शाहू मिल्स स्मारकाचा आराखडा कुलूपबंदच

Shahu Mills monument is locked
Shahu Mills monument is locked

कोल्हापूर : न्यायालयीन खटले निकाली निघाल्यामुळे शाहू छत्रपती मिलची सुमारे पावणे सत्तावीस एकर जागा तंटामुक्त झाली आहे. 2012 ला या जागेत राजर्षी शाहू स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. मात्र आजपर्यंत येथे काहीच झाले नाही. सध्या राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. त्या उद्‌घाटन समारंभातच शाहू मिलच्या जागेतील स्मारकाचे भूमीपूजन करण्याचा निर्धार कोल्हापूरच्या जनतेने केला पाहिजे. नेत्यांनी सुद्धा शाहूमिलमध्ये स्मारक पूर्ण करण्यासाठी अपेक्षीत निधीची व्यवस्था आगामी अर्थसंकल्पात करण्याची घोषणा केली पाहिजे. 

शाहू मिलची 27 सप्टेबर 1906 ला स्थापना झाली. अनेक बेरोजगारांना या मिलने आधार दिला. अनेकांच्या मुलाबाळांना शाळा शिकण्यासाठी पुस्तके देण्यापर्यंतचे काम मिलने केले. ठराविक वेळेत वाजणारा भोंगा शाहू मिलची ओळख होती. शाहू मिल बंद पडली आणि याच मिलची एक एक यंत्रसामुग्री विकली गेली. केवळ रिकामी जागा आणि ती सांभाळण्यासाठी खासगी सुरक्षा रक्षक एवढेच मिलचे आस्तित्व राहिले आहे.

मिल्सला पुन्हा उर्जित अवस्था आणण्याचा प्रयत्न डिसेंबर 2012 ला झाला. तत्कालीन आमदार के.पी.पाटील यांनी विधानसभेत मिल्सच्या जागी स्मारक करण्याचा मुद्दा मांडला. त्याला बहुमताने मंजुरी मिळाली आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे भेट दिली. तातडीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले. खासगी कंपनीकडून हा आराखडा तयार केला. तो फेरतपासणीसाठी कोल्हापूर महानगरपालिकेकडे दिला. आजपर्यंत हा आराखडा लालफितीत अडकला आहे. 

शेअर्सबाबत सर्व खटले निकाली 
2002 आणि 2003 मध्ये शाहू छत्रपती मिल्सच्या जागेतील शेअर्स बाबत खटला सुरू झाला होता. त्याला पूर्वींचे संदर्भ होते. मात्र हा खटले दोन महिन्यापूर्वीच निकाली निघाले आहेत. त्यामुळे न्यायालयीबाबींचा मुद्दा पुढे करून शाहू स्मारक टाळण्याचेही आता कोणतेही कारण उरले नाही. 

दृष्टीक्षेपात 
*शाहू मिल्सची एकूण जमीन ः पावणे 27 एकर 
*रेडीरेकनर प्रमाणे मालमत्ता- 110 कोटी 
*बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत किमान 200-250 कोटी 
*सध्या कोणताही खटला प्रलंबित नाही 
*सध्या मालकी-महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ 
*शाहू स्मारक करण्याची घोषणा ः डिसेंबर 2012 मध्ये 
*तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट 
*आराखडा तयार * फेरतपासणीसाठी महापालिकेकडे सुपुर्द 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com