"शाळा तेथे ग्रंथालय'चा सोलापूर पॅटर्न तयार करणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सोलापूर - वाचनसंस्कृती वाढण्यासाठी "शाळा तेथे ग्रंथालय' उपक्रमामध्ये "सोलापूर पॅटर्न' तयार करणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी "सकाळ'ला सांगितले. सुसंस्कृत पिढी घडविणे हे ग्रंथालयांचे काम आहे. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली तरच हे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांकडे येण्याऐवजी ग्रंथालयांनीच विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे. त्यामुळे वाचक वाढतील; शिवाय, ग्रंथसंपदेचा उपयोगही होईल. आतापर्यंत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आठवड्यातील एक दिवस या उपक्रमासाठी मिळावा, अशी अपेक्षा आहे.

सोलापूर - वाचनसंस्कृती वाढण्यासाठी "शाळा तेथे ग्रंथालय' उपक्रमामध्ये "सोलापूर पॅटर्न' तयार करणार असल्याचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी "सकाळ'ला सांगितले. सुसंस्कृत पिढी घडविणे हे ग्रंथालयांचे काम आहे. लहानपणापासूनच वाचनाची गोडी लागली तरच हे शक्‍य आहे. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांकडे येण्याऐवजी ग्रंथालयांनीच विद्यार्थ्यांपर्यंत पोचले पाहिजे. त्यामुळे वाचक वाढतील; शिवाय, ग्रंथसंपदेचा उपयोगही होईल. आतापर्यंत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आठवड्यातील एक दिवस या उपक्रमासाठी मिळावा, अशी अपेक्षा आहे. वाचकांना हवा असलेला ग्रंथ कोणत्या ग्रंथालयात आहे याची माहिती मिळण्यासाठी देश स्तरावर ई-ग्रंथालय सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: shala tethe granthalay solapur pattern