शनैश्वर देवस्थानाची नोकरभरती अखेर रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

सोनई - शनिशिंगणापूर ग्रामस्थांच्या उपोषणाची दखल घेत शनैश्‍वर देवस्थान ट्रस्टने केलेली 105 कर्मचाऱ्यांची भरती अखेर रद्द करण्यात आली. दरम्यान, कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करून आज दुपारी उपोषण सुरू केले.

शनैश्‍वर देवस्थानातील बोगस नोकरभरती, दप्तरात केलेला फेरफार, बेकायदा पगारवाढ व लंपास केलेल्या देवस्थानाच्या वाहनांबद्दल आवाज उठवित ग्रामस्थांनी महाद्वारासमोर उपोषण सुरू केले होते. बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थानाचे विश्वस्त डॉ. वैभव शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर, माजी विश्वस्त बाळासाहेब बोरुडे, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रकाश शेटे आदींनी त्यात सहभाग घेतला. उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज सहायक धर्मादाय आयुक्त ज्ञानेश्वर दुंडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर नोकरभरतीचा निर्णय रद्द करण्यात आला. दरम्यान, देवस्थानाचे गायब झालेले जेसीबी व डंपर दुपारी गावात येताच ग्रामस्थांनी जल्लोष केला.

Web Title: shaneshwar devasthan recruitment cancel