शांतमती माताजींचे यमसल्लेखना व्रताच्या 90 व्यादिवशी महानिर्वाण 

अभय जोशी
शनिवार, 31 मार्च 2018

या निमित्ताने काही दिवसांपूर्वी धर्मसंस्कारासाठी कलिकुंड पार्श्‍वनाथ विधान अयोजित करण्यात आले होते. या विधानाची सांगता आचार्य 108 श्री अनेकांत सागरजी महाराज, गणिनी गुरु 105 आर्यिका शांतमती माताजी, सुदर्शन माताजी, बालब्रम्हचारी प्रिती दिदी यांच्या उपस्थितीत झाली होती. 

पंढरपूर : जैन समाजाच्या आर्यिका 105 शांतमती माताजी यांचे आज (शनिवारी) पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी महानिर्वाण झाले. त्यांनी अन्न, पाणी त्याग करुन सुुरु केलेल्या यमसल्लेखना व्रताचा आज (शनिवारी ) 90 वा दिवस होता. 

गेल्या काही वर्षात 36 दिवसांपेक्षा जास्त दिवस यम सल्लेखना व्रत कोणीही करु शकलेले नव्हते. त्यामुळे शांतमती माताजींच्या या व्रताची नोंद ऐतिहासिक ठरण्याची शक्‍यता असून वैद्यकीय क्षेत्रातही या विषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात होते. 

शेगावदुमाला (ता.पंढरपूर) येथील त्रिलोकतीर्थक्षेत्री आर्यिका 105 शांतमती माताजी यांनी गुरुमा गणिनी 105 शांतमती माताजी व करुणामती माताजी यांच्या सानिध्यात 31 डिसेंबर 2017 पासून यम सल्लेखना घेतली असून अन्नपाण्याचा त्याग करुन ध्यानधारणा सुरु केली होती. 

शांतमती माताजींचे वय 75 होते. त्यांनी बंदिस्त खोलीचा त्याग केला होता. त्या रात्री उघड्यावरच कागदाच्या कत्रणावर झोपत होत्या. पूर्वीच त्यांनी आहारातून दूध, भाजापाला, शेंगदाणे, तेल, लोणी, दही आदीचा त्याग केलेला होता. मागील आठ वर्षांपासून त्यांनी आहारात कोणतेही धान्य घेतलेले नव्हते. फळांचा व साखरेचाही त्यांनी त्याग केलेला होता. यम सल्लेखना महोत्सव सुरु होई पर्यंत केवळ नारळाचे पाणी, मठ्ठा, गंजी असा आहार त्यांनी सिमित ठेवला होता. 

या निमित्ताने काही दिवसांपूर्वी धर्मसंस्कारासाठी कलिकुंड पार्श्‍वनाथ विधान अयोजित करण्यात आले होते. या विधानाची सांगता आचार्य 108 श्री अनेकांत सागरजी महाराज, गणिनी गुरु 105 आर्यिका शांतमती माताजी, सुदर्शन माताजी, बालब्रम्हचारी प्रिती दिदी यांच्या उपस्थितीत झाली होती. 

शांतमती माताजींनी यमसल्लेखना व्रत अर्थात मृत्यू महोत्सव सुरु केल्यापासून राज्याच्या विविध भागातून जैनबंधू भगिनी त्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने पंढरपूर तालुक्‍यातील शेगाव दुमाला येथे गर्दी करत होते. जैन धर्मिय लोक कोणतेही व्रत अतिशय निष्ठेने आणि श्रध्देने करतात. या पार्श्‍वभूमीवर तब्बल 80- 90 दिवस अन्नपाण्या शिवाय राहणे हे आश्‍चर्य समजले जात होते. वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळींना या संदर्भात विचारले असता त्यांनी अशी गोष्ट घडणे केवळ अशक्‍य असल्याचे नमूद केले होते. 

त्सवाचे प्रमुख शैलेश कोठारी यांना विचारले असता "सकाळ" शी बोलताना ते म्हणाले, यापूर्वी 1955 साली श्रीक्षेत्र कुंथलगिरी येथे शांतीसागरजी महाराज ( वय 85) यांनी यम सल्लेखना व्रत केले होते. 36 व्या दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले होते. शांतमती माताजींचे आज पहाटे 90 व्या दिवशी निर्वाण झाले असून आज दुपारी अकरा वाजता अंत्यविधी केले जाणार आहेत.

Web Title: Shantmati Mataji is no more Pandharpur