शरद बनसोडे यांनीही केले पाणी फाउंडेशनमध्ये श्रमदान

हुकूम मुलाणी
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मंगळवेढा - खा. शरद बनसोडे यांनी तालुक्यातील शिरनांदगी व रडडे गावाला भेट देवून या भागातील लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या डोंगरगाव येथे पाणी फौऊडेशनच्या कामावर श्रमदान करुन सहभाग घेतला.

दौऱ्यात त्यांच्या समवेत, शंकर वाघमारे, जिल्हाउपाध्यक्ष शशीकांत चव्हाण, तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, बिरूदेव घोगरे, दत्तात्रय जमदाडे, अविनाश आठवले, सतीश भगरे, विश्वास चव्हाण, बाळासाहेब कवाळे, गुलाब थोरबोले सुरेश कांबळे, दिनेश पाटील, यशवंत खताळ, रमेश काशीद, मोहन सांगोलकर, पांडूरंग शिंदे आदी उपस्थित होते. 

शिरनांदगी तलावाची पाहणी करुन खा.बनसोडे म्हणाले की, युती शासनाने मंजूरी दिलेल्या म्हैसाळच्या योजनेसाठी मागील सरकारने दहा वर्षात निधी दिला नाही. परंतु, सध्या केंद्रात व राज्यातील सत्ता बदलाने या रखडलेल्या कामासाठी निधी मिळाला आहे. हे काम तातडीने चांगल्या पध्दतीने झाले पाहिजे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनीही पाठपुरावा केला पाहिजे. शिरनांदगी पहिलाच खासदार निधी देण्याचे काम केले. तर मंगळवेढा येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील शहर व ग्रामीण भागातील बेरोजगार मुलासाठी नोकरी मिळावी. ग्रामीण भागातील मुलांनी गाव सोडण्याची तयारी करावी आणि या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीचे प्रशिक्षण घेवून स्वताच्या पायावर उभा रहावे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. 

दहावी, बारावी शिक्षण घेतलेल्या 54 बेरोजगाराची मुलाखतीतून निवड करण्यात करून त्यांना तीन महिने पुणे येथील प्रशिक्षण दिले जाणार असून, या प्रशिक्षणात रहाणे व जेवण विनामुल्य आहे. त्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Sharad Bansode also did Shramdan in Water Foundation