शरद कुंभार ठरले मिरजेतील पहिले आयर्नमॅन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

एक नजर

  • मिरज येथील स्थापत्य अभियंता शरद कुंभार यांनी मिळवला व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आयर्नमॅंन स्पर्धेचा किताब. 
  • मिरजेतील ते पहिलेच आयर्नमॅन. 
  • आयर्नमॅंन 70.3 एशिया-पॅंसिफीक ट्रॉंयथॅंलॉंन अजिंक्‍यपद स्पर्धेत सहभाग. 
  •  7 तास 47 मिनिटे व 34 सेकंदांत पूर्ण केली स्पर्धा. 

मिरज - येथील स्थापत्य अभियंता शरद कुंभार यांनी व्हिएतनाम येथे पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेचा किताब मिळवला. मिरजेतील ते पहिले आयर्नमॅंन ठरले आहेत. 

व्हिएतनाममध्ये झालेल्या आयर्नमॅन 70.3 एशिया-पॅंसिफीक ट्रॉंयथॅंलॉंन अजिंक्‍यपद स्पर्धेत ते सहभागी झाले होते.  7 तास 47 मिनिटे व 34 सेकंदांत स्पर्धा पुर्ण केली. 

1.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 90 किलोमीटर सायकल चालवणे आणि 21.1 किलोमीटर धावणे अशी शारिरिक क्षमतेची परीक्षा पाहणारी ही स्पर्धा होती. ती पुर्ण करण्यासाठी 8 तास 30 मिनिटांचा वेळ होता. 

 मिरजेचा पहिला आयर्नमॅन होण्यासाठी दीड वर्षांपासून प्रयत्न करत होतो. 40 अंश इतक्‍या तापमानात खडतर स्पर्धा पुर्ण करणे मोठे आव्हान होते. गेल्यावर्षी मी गोवा ट्रॉंयथॉंलॉंन पुर्ण केली, त्याचा फायदा या स्पर्धेत झाला. साठ देशांतील दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले, त्यामध्ये तेरा भारतीयांचा समावेश होता. सांगलीचे पहिले आयर्नमॅन स्वप्नील कुंभारकर यांनी दिलेल्या टिप्स स्पर्धेतील यशासाठी कामी आल्या.  

- शरद कुंभार

Web Title: Sharad Kumbhar from Miraj became the first iron-man