शरद पवार म्हणाले..उदयनराजे, या गाडीत बसा!

Sharad Pawar
Sharad Pawar

सातारा : शरद पवार गाडीच्या दिशेने जात असताना थांबले.. कार्यकर्त्यांकडे एक निरोप दिला.. काही मिनिटांमध्येच उदयनराजे भोसले, शरद पवार, शशिकांत शिंदे हे तिघेही एकाच गाडीतून प्रवासाला निघाले आणि गाडी चालवत होते शिवेंद्रसिंहराजे भोसले!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातार्‍यातील दोन्ही राजांमध्ये पुन्हा एकदा मनोमिलन करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे आज (शनिवार) उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघांनाही एकाच गाडीतून प्रवास केला.

त्याचं झालं असं.. एका कार्यक्रमासाठी शरद पवार पुण्याहून हेलिकॉप्टरने सातार्‍यात आले. उदयनराजेंनी त्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर शरद पवार गाडीच्या दिशेने गेले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांकडे विचारणा केली, की 'उदयनराजे कुठे आहेत?'! मग त्यांना बोलाविण्याचा निरोपही पाठविण्यात आला.

उदयनराजे आल्यानंतर पवार यांनी त्यांना 'या गाडीत बसा' असे सांगितले. ती गाडी होती शिवेंद्रसिंहराजे यांची! पवार आणि उदयनराजे त्या गाडीत बसत असल्याचे पाहून शिवेंद्रसिंहराजे यांनी चालकाला बाजूला होण्यास सांगत स्वत: गाडी चालविण्यासाठी पुढे आले.

अखेर पोलिस कवायत मैदान ते करंजेपेठ रुग्णालयापर्यंत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे, शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांनी एकत्र प्रवास केला.

'उदयनराजेंबाबत माध्यमांनी चिंता करू नये. त्यांची काळजी घ्यायला आम्ही आहोत', अशा शब्दांत शरद पवार यांनी काल (शुक्रवार) उदयनराजे यांची पाठराखण केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com