इतिहास लिहिताना इतिहासकाराची भूमिका महत्त्वाची- पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमृत महोत्सव गौरव समितीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते डॉ. पवार यांचा घोंगडी, गौरवपत्र, गौरवचिन्ह देऊन सत्कार झाला.

कोल्हापूर - ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सखोल संशोधनातून इतिहासाचे वास्तव चित्र मांडण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार शरद पवार यांनी आज येथे केले.

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अमृत महोत्सव गौरव समितीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते डॉ. पवार यांचा घोंगडी, गौरवपत्र, गौरवचिन्ह देऊन सत्कार झाला. अध्यक्षस्थानी भाई वैद्य होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला. 

पवार म्हणाले, "इतिहास लिहिताना इतिहासकाराची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. तो ज्या विचारधारेच्या माध्यमातून इतिहास लिहितो. तो इतिहास नवी पिढी वाचत असते. डॉ. पवार यांची भूमिका ही अखंडपणे सत्य व वास्तव मांडण्याची राहिली आहे. टिका-टिप्पणीची चिंता त्यांनी केली नाही. काही घटकांनी वेगळ्या पद्धतीने शिवपुत्र संभाजी महाराज यांची बदनामी केली. डॉ. पवार यांनी मात्र त्यांचे वास्तव चित्र समोर आणले. छत्रपतींचा गुरू म्हणून दादोजी कोंडदेवांना उभा करण्याचा सुरू झालेला प्रयत्न तरूण पिढीसमोर गेला असता, तर त्याचे परिणाम वेगळे झाले असते. या वेळीसुद्धा डॉ. पवार यांनी पुराव्यांद्वारे कोंडदेव हे छत्रपतींचे गुरू नसल्याचे दाखवून दिले. कर्तुत्त्व असताना अनुल्लेख करण्याचा डावही काही घटकांकडून रचला गेला. महाराणी ताराबाईंचे योगदान वादातीत असताना, त्यांना अनुल्लेखाने संपविण्याचा प्रयत्न झाला. पेशव्यांच्या कचाट्यातून कोल्हापूर संस्थान वाचविण्याचे काम जिजाबाईंनी केले. पण, इतिहास आज किती जणांना ठाऊक आहे? काहींचे कर्तुत्त्व नसताना उदातीकरण केले जाते, हेच दुर्देवी आहे.'' 

वैद्य कसा असा बोलतो..? 
वैद्य यांनी उच्चवर्णियांवर शाब्दीक प्रहार केल्यानंतर श्री. पवार म्हणाले, "वैद्य असा कसा बोलतो? याचे अनेकांना आश्‍चर्य वाटेल. पण, तो कायस्थ आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्याप्रमाणे प्रागैतिक विचारांची मांडणी करणारा असून, तीच त्यांची विचारधारा आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचे आश्‍चर्य वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.'' 

पवार यांनी डॉ. पवार हे त्यांच्यापेक्षा एक वर्षाने लहान असल्याचे सांगत गेल्यावर्षी त्यांचा अमृतमहोत्सव झाला. यंदा डॉ. पवार यांचा आहे. हा क्षण मोलाचा आहे. मात्र, डॉ. पवार यांनी माझ्यापेक्षा लहान असून, माझ्याआधी एक वर्ष लग्न केले, असा उल्लेख केला आणि सभागृहात हशा पिकला. 

Web Title: Sharad Pawar attends book publication programme